हर घर में अब एक ही नाम एक ही नारा गुंजेगा.!

भारत का बच्चा बच्चा जय जय श्रीराम बोलेगा - मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे (जगदीश काशिकर) : अयोध्येतील प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पूर्वसंध्येला ठाणे शहरात राम रथाची भव्य मिरवणूक काढून मोठ्या जल्लोषात मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वप्नपूर्तीचा क्षण साजरा केला. ठाण्यातील कोपिनेश्वर मंदिरात दर्शन घेऊन या मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली तर विठ्ठल मंदिर आणि इतर मंदिरात दर्शन घेत घेत ही मिरवणूक हजारो राम भक्तांच्या साथीने मासुंदा तलावापर्यंत आली. 
यावेळी ठाण्याचे भूषण असलेल्या मासुंदा तलावाला आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. तसेच यावेळी लेझर शो द्वारे रामायणाची कथा दाखवण्यात आली. तसेच शरयू आरतीची अनुभूती देणारी श्रीरामाची आरती करण्यात आली. यासमयी आकर्षक अशी आतिषबाजी करून जल्लोष करण्यात आला. 
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पाहिलेले एक स्वप्न आज साकार होत असल्याचा आनंद होत असल्याचे मत यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. त्याच प्रमाणे करोडो राम भक्तांचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांनी प्रत्यक्षात आणून दाखवले असल्याचा आनंद आणि समाधान वाटत असल्याचे मत याप्रसंगी त्यांनी व्यक्त केले. 
यावेळी आमदार प्रताप सरनाईक, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, माजी आमदार रवींद्र फाटक, शिवसेनेचे महाराष्ट्र राज्य समन्वयक आणि प्रवक्ते नरेश म्हस्के, भाजपचे सरचिटणीस संदीप लेले, माजी नगरसेवक अशोक वैती, विकास रेपाळे, किरण नाकती, अनिल भोर आदी यावेळी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.