भद्रावती (वि.प्र.) - संताजी जगनाडे महाराज जयंती महोत्सव भद्रावती येथील संताजी सभागृहात दोन दिवशीय कार्यक्रमाने संपन्न झाले. संताजी सभागृह संताजी नगर भद्रावती येथे पार पडलेल्या जयंती उत्सवात पहिल्या दिवशी 20 जाने 2024 ला महिलांसाठी हळदी कुंकु, होम मिनिस्टर व सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. महिलांना मार्गदर्शनपर कार्यक्रम सुध्दा घेण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. प्रेमा पोटदुखे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. केशनी हटवार यांनी केले.
दुसऱ्या दिवशी दिनांक 21 जानेवारीला 2024 भद्रनाग मंदिर ते संताजी महाराज सभागृहापर्यंत भव्य शोभायात्रा काढण्यात आली. त्या शोभायात्रेचे उद्घाटन मा डॉ भगवानजी गायकवाड आणि ओमप्रकाश मांडवकर यांचे हस्ते करण्यात आले. बैलबंडी, भजनाच्या गजरात संताजी ची पालखी समाज बांधवांच्या सहभागाने मुख्य रस्त्याने मार्गक्रमण करत संताजी नगर येथे आली. संताजी सभागृहामध्ये विद्यार्थ्यांचा गुणगौरव व ज्येष्ठ मान्यवरांचा सत्कार सोहळा घेण्यात आला. त्या कार्यक्रमाला कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री राजेश बेले चंद्रपूर, उद्घाटक श्री डॉ प्रकाश महाकाळकर गटशिक्षणाधिकारी भद्रावती, प्रमुख अतिथी सुमेध खनके मुख्य अभियंता महावितरण भद्रावती, आशिष देवतळे कार्याध्यक्ष महाराष्ट्र प्रांतिक तेली महासभा, निलेश बेलखेडे सिनेट सदस्य गोंडवाना विद्यापीठ, मीनाक्षी गुजरकर, मोहनदासजी देशमुख, रमेशजी गाठे, वसंतराव लोणकर, आनंदराव वाढई, दादाजी चेनै ,नारायणराव शेंडे, मधुकरराव पारधे उपस्थित होते. महिलांच्या विविध स्पर्धाचे आयोजन महिला अध्यक्ष सौ अनिताताई आष्टणकर यांच्या नेतृत्वात घेण्यात आल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री पुरुषोत्तम नैताम अध्यक्ष संताजी स्नेही मंडळ भद्रावती यांनी केले. संचालन विनोद बाळेकळमकर व दीपक निकुरे यांनी केले तर आभार प्रदर्शन सुरेश मस्के सचिव यांनी केले. कार्यक्रमासाठी उपाध्यक्ष प्रशांत झाडे व सतीश पावनकर, रितेश वाढई कोषाध्यक्ष, सुधीर पारधी, गोपाल गायकवाड, योगेश खोब्रागडे, अमोल कोटकर, कुणाल पारधे , पराग बदभुज, अनिरुद्ध डंबारे, निखिल बावणे, महेंद्र ठाकरे, गोपाल पारधे, जयश्री कांबडी, अश्विनी झाडे, यामिनी नैताम, रिता बावनकुळे, मोहना वैरागडे, सोनाली नरड व समाज बांधव भगिनींनी अथक परिश्रम घेतले.