मुंबई (जगदीश काशिकर) : आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चेंबूर विधानसभेमध्ये वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू सुजात आंबेडकर यांचे जंगी स्वागत करण्यात आले. अण्णाभाऊ साठे नगर येथून निघालेले ही रॅली लाल डोंगर, सिद्धार्थ कॉलनी, पी एल लोखंडे मार्ग या आंबेडकरी वस्त्यांमध्ये तरुणवर्गातून सुजात आंबेडकर यांचे जंगी स्वागत करण्यात आले. ठिकठिकाणी महिलांनी आरती आणि पुष्पवृष्टी करून सुजात आंबेडकर यांचा सन्मान करण्यात आला. सुजाता आंबेडकर यांच्या आगमनाने आंबेडकरी चळवळीतील तरुण वर्गामध्ये उत्साह पाहायला मिळाला. भारतीय संविधानाचे निर्माते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घराण्यातील तिसरी पिढी राजकारणामध्ये प्रवेश केला असून त्यांचे जनतेमधून स्वागत होत आहे.