बल्लारपुर (का.प्र.) : श्री संत तुकाराम महाराज सेवा मंडळ बल्लारपूर बामणी त्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा रामटेक खिंडसी नारायण टेकडी या ठिकाणी सामाजिक सहलीमध्ये 375 समाज बंधु आणि भगिनींनी सहभाग घेतला दिनांक 28 -1-2024 ला एकूण सात ट्रॅव्हल्स एक लहान गाडी एकूण आठ गाड्या समान बांधवांनी या सहलीचा आनंद लुटला महत्त्वाचा उद्देश या सहली मागील हाच आहे की सर्व समाज बंधू भगिनींना एकत्रित येऊन निसर्गरम्य ठिकाणी व आपल्या दैनंदिनी कार्यातून एकत्रित मेळावा हाच मुख्य उद्देश आहे या सहलीमध्ये मंडळाचे अध्यक्ष श्री पी.यु. जरीले उपाध्यक्ष प्राध्यापक म.यु.बोंन्डे सचिव प्रा.आर. न. खाडे संचालक माळेकर सर श्री वाय.के.बोबडेसर श्री भास्कर वडस्कर युवा महिला आघाडीचे अध्यक्षा सौ.वंदना पोटे अपाध्यकक्षा किरण बोबडे सौ सुवर्णा कष्टी बामणी येथील सूर्यभान मालेकर सहदेव डेरकर काटोले सर तुषार काळे प्रभाकर पोटे या सर्वांनी घरोघरी जाऊन समाज बांधवांना एकत्रित करून ही सहल यशस्वी केली रामटेक येथील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक श्री गजू भाऊ बिसणे यांनी आपल्या अत्यंत व्यस्त कामातून वेळात वेळ काढून अत्यंत मोलाचे सहकार्य केले 400 लोकांना स्वादिष्ट व रुचकर भोजन उपलब्ध करून दिले सहलीमध्ये आणि लहान मुलांनी व स्त्रियांनी सुद्धा मनमुराद आनंद लुटला व पुढच्या वर्षी अशाच निसर्गरम्य ठिकाणी सहल आयोजित करावी असे मंडळाला विनंती केली या सायली सहलीसाठी मंडळाच्या कार्यकारी सदस्यांनी व आजीवन सदस्यांनी सुद्धा शुभेच्छा दिल्या.