चोरा येथे राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे उद्घाटन संपन्न.!

निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयाचे चोरा येथे राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे उद्घाटन संपन्न.!

भद्रावती (वि.प्र.) - स्थानिक निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालय चे राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिराचे उद्घाटन स्व. मातोश्री यमुनाबाई शिंदे विद्यालय. चोरा येथे संपन्न झाले.या शिबिराच्या उद्घाटनिय कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. एल. एस. लडके, उद्घाटक, माननीय रवींद्रभाऊ शिंदे, माजी अध्यक्ष, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, चंद्रपूर, विशेष अतिथी भद्रावती शिक्षण संस्था, भद्रावतीचे सचिव प्रा डॉ कार्तिक शिंदे, माननीय प्राध्यापक, धनराज अस्वले, माजी प्राध्यापक, बेहरीन गल्फ, प्रमुख अतिथी, सौ. संगीता खिरटकर, सरपंच, चोरा, उपसरपंच, श्री विलास जीवतोडे, श्री एम. यु. बरडे, मुख्याध्यापक व राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी, प्रा. डॉ. गजेंद्र बेदरे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात थोर पुरुषांच्या प्रतिमेला माल्या अर्पण करून व उपस्थित सर्व मान्यवरांच्या स्वागताने झाली.सर्वप्रथम राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. गजेंद्र बेदरे यांनी आपल्या प्रास्ताविकेतून देशाच्या शैक्षणिक व सर्वांगीण विकासात जागरूक मतदाराची भूमिका या संकल्पनेवर आधारित सुशासन- जागरूक मतदार तसेच या शिबिराचा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण करणे हा एन. एस. एस. चा मुख्य उद्देश आहे असे स्पष्ट केले.
सर्वप्रथम या कार्यक्रमाचे विशेष अतिथी श्री धनराज अस्वले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत विद्यार्थ्यांना जीवनात पुढे जायचे असेल तर वेळेला महत्त्व द्या तरच जीवनात पुढे जाऊ शकता तसेच वेळ आपल्याला संधी देते त्या संधीचा सदुपयोग करावा तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना आजच्या खेड्यांची समस्यांची सविस्तर माहिती दिली त्यात सध्याच्या शिक्षणाच्या परिस्थितीचा आढावा घेतला तसेच विद्यार्थ्यांना समाजकारणासाठी पुढे येण्याचे आवाहन केले व तसेच जीवनात विद्यार्थ्यांनी मानव कल्याणासाठी मदत करावी असे आपले मत व्यक्त केले. 
तसेच या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय रविंद्रभाऊ शिंदे, माजी अध्यक्ष, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, चंद्रपूर यांनी विद्यार्थ्यांना लोकशाहीच्या माध्यमातून आपल्याला सरकारकडून कामे करून घ्यावयाचे आहे तसेच जास्तीत जास्त मतदार झाले पाहिजे त्यामुळे लोकशाही बळकट होते व सुशासनामुळे राष्ट्र चालते. विद्यार्थ्यांना मोबाईलच्या व्यसनापासून दूर राहा असे आवाहन केले तसेच आई-वडिलांची सेवा करा तुम्हाला सर्व प्राप्त होते व आपण नेहमी मदतीचा हात पुढे करत जा असे विद्यार्थ्यांना आवाहन केले.
या कार्यक्रमाचे विशेष अतिथी भद्रावती शिक्षण संस्था, भद्रावतीचे सचिव डॉ. कार्तिक शिंदे यांनी सध्याच्या देशाच्या परिस्थितीची सविस्तर माहिती दिली त्यामध्ये आपला देश सर्वधर्मसमभावाने तयार झाला आहे त्यामुळे आपण एकत्रित राहतो व आपली लोकशाही टिकून राहते तसेच आपल्या मतदानाचा चांगला उपयोग करा त्यामुळे आपल्या देशाचे सुशासन व्यवस्थित सुरू राहते तसेच आजच्या युवा पिढीवर देशाची जबाबदारी वाढली त्याकरिता त्यांनी जागृत राहण्याचे आवाहन केले.तसेच या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी उपसरपंच श्री विजय जीवतोडे यांनी एन.एस.एस. मध्ये भाग घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत सर्व प्रकारची मदत करण्याचे आश्वासन दिले.
तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एल. एस. लडके यांनी देशाच्या लोकशाही बद्दल सविस्तर माहिती दिली ते चालवायचं असेल तर मतदार जागृत असणे फार आवश्यक आहे त्यामुळे देशाचे सुशासन चांगले सुरू राहते तसेच जागरूक मतदारदारामुळे देशाचे कल्याण होते व चांगले राज्य चालविण्यासाठी चांगल्या प्रतिनिधींना निवडून दिले पाहिजे तसेच विद्यार्थ्यांनी खेड्यातील जनजीवन कसे असते ते जवळून पाहावे याकरिता विद्यार्थ्यांनी अशा प्रकारच्या शिबिरामध्ये भाग घेतला पाहिजे असे आवाहन केले.या उद्घाटन कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना, कार्यक्रम अधिकारी, प्रा. डॉ गजेंद्र बेदरे तर आभार प्रदर्शन प्रा. डॉक्टर शशिकांत सित्रे यांनी केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता प्रा. सचिन श्रीरामे, डॉ के. पी. जुमडे, श्री शरद भावरकर, श्रेयस रोडे, मयूर नागपुरे, सानिया शेख, अनामिका चौधरी यांनी अथक परिश्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.