भद्रावती (वि.प्र.) : स्थानिक निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयातील प्राणीशास्त्र व वनस्पतीशास्त्र विभागातर्फे दिनांक 2 फेब्रुवारी 2024 रोजी जागतिक पाणथळ दिनानिमित्त ऑनलाइन राष्ट्रीय परिषदे चे दोन व्याख्याने व पेपर व पोस्टर प्रेसेंटेशन चे सादरीकरण करून आयोजन करण्यात आले होते.
या ऑनलाइन राष्ट्रीय परिषदेचे पॅटरार्न डॉक्टर विवेक शिंदे, अध्यक्ष, भद्रावती शिक्षण संस्था, भद्रावती, डॉक्टर कार्तिक शिंदे, सचिव, भद्रावती शिक्षण संस्था, भद्रावती, डॉक्टर विशाल शिंदे सहसचिव, भद्रावती शिक्षण संस्था, भद्रावती, आयोजक, प्राचार्य डॉक्टर लेमराज लडके, प्रमुख व्याख्याते प्राध्यापक डॉक्टर राजकुमार खापेकर, वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख, सिंधू महाविद्यालय, नागपूर, प्राध्यापक डॉक्टर गजानन वाघ, प्राणीशास्त्र विभाग, श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावती, प्राध्यापक डॉक्टर नरेंद्र हरणे, प्राणिशास्त्र विभाग प्रमुख, प्राध्यापक डॉक्टर नथू वाढवे वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख, प्राध्यापक डॉक्टर शशिकांत सीत्रे, प्राध्यापक डॉक्टर प्रवीणकुमार नासरे व प्राध्यापक संदीप प्रधान उपस्थित होते.
दरवर्षी 2 फेब्रुवारी हा दिवस जागतिक पाणथळ दिवस म्हणून जगभरात साजरा केला जातो. पाणथळ जागांचे संवर्धन व्हावे यासाठी जनजागृती व्हावी म्हणून ऑनलाइन पद्धतीने राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. याकरिता एकूण 150 प्राध्यापक, संशोधक व संशोधक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला त्यात महाराष्ट्रसह, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तरांचल छत्तीसगड या राज्यांमधून उपस्थित होते.
सर्वप्रथम या ऑनलाइन राष्ट्रीय परिषदेमध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर लेमराज लडके यांनी आपल्या प्रास्तावकेतून जागतिक पांनथळ दिवसाचे महत्त्व स्पष्ट करीत आज दिवसेंदिवस आपल्या सभोवतालचे पाणथळ नाहीसे होत आहे किंवा त्याकडे सर्वांचे दुर्लक्ष होत आहे त्यामुळे दिवसेंदिवस पाणीटंचाई होत आहे यामुळे पशुपक्षी व मानवावर त्याचा परिणाम होताना दिसत आहे. आपल्या सभोवतालचे पाणथळ वाचावे व सुस्थितीत राहावे करिता आपण सर्वांनी सहकार्य केले पाहिजे अशी आशा आपल्या प्रास्ताविकेतून व्यक्त केली.
यानंतर या ऑनलाइन राष्ट्रीय परिषदेच्या प्रथम सत्रात प्राध्यापक डॉक्टर राजकुमार खापेकर, नागपूर यांनी पाणथळे वाचविण्याची का गरज आहे या विषयावर आधारित स्लाईड शोच्या माध्यमातून सादरीकरण केले. त्यात त्यांनी जागतिक पाणथळे त्यांची संख्या त्यांचे ठिकाणे व त्यांची सध्याची स्थिती यावर सखोल असे मार्गदर्शन करीत पानथळे वाचविण्याकरिता कोणत्या कोणत्या उपाययोजना कराव्यात यावर सखोल प्रकाश टाकला.
यानंतर प्राध्यापक डॉक्टर गजानन वाघ, अमरावती यांनी पाणथळांचे रामसर च्या दृष्टिकोनातून महत्व व पक्षी संवर्धन या विषयावर आधारित स्लाईड शोच्या माध्यमातून सादरीकरण केले. त्यात त्यांनी जागतिक रामसर पानस्थळे, भारतातील रामसर पानथळे यावर सखोल मार्गदर्शन करीत आपण पाणथळांच्या माध्यमातून पक्षांचे कसे संवर्धन करू शकतो यावर मार्गदर्शन करीत सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.
यानंतर जागतिक पाणथळ दिवसानिमित्त पेपर व पोस्टर प्रेसेंटेशनच्या आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये एकूण 25 संशोधक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला त्यात प्रथम क्रमांक कुमारी रुचिता जीपकाटे, संशोधक विद्यार्थिनी, वनस्पतीशास्त्र विभाग, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, नागपूर विद्यापीठ, नागपूर द्वितीय क्रमांक कुमारी प्रगती गुप्ता, संशोधक विद्यार्थीनी, प्राणीशास्त्र विभाग, पंडित शंभुनाथ शुक्ला विद्यापीठ, शहाडोल, मध्य प्रदेश तर तृतीय क्रमांक कुमारी वैशाली पोडे, संशोधक विद्यार्थीनी, प्राणीशास्त्र विभाग, जनता महाविद्यालय, चंद्रपूर यांनी प्राप्त केला.
तसेच याप्रसंगी महाविद्यालय स्तरावर जागतिक पाणथळ या विषयावर आधारित चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्यात प्रथम क्रमांक कुमारी भूमी बेहेरे, बीएससी भाग एक, द्वितीय क्रमांक कुमारी माहेश्वरी काळे, बीएससी भाग दोन व तृतीय क्रमांक कुमारी प्रणाली तुंगपिंडी बीएससी भाग दोन या विद्यार्थिनींनी पटकावला. प्राचार्य डॉक्टर लेमराज लडके यांच्या शुभहस्ते प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापक डॉक्टर शशिकांत सीत्रे तर आभार प्रदर्शन प्राध्यापक डॉक्टर प्रवीण कुमार नासरे यांनी केले.
या ऑनलाइन राष्ट्रीय परिषदे करिता ग्रंथालय विभाग प्रमुख, प्राध्यापक संदीप प्रधान व संगणक शास्त्र विभाग प्रमुख, प्राध्यापक डॉक्टर खादरी यांनी सहकार्य केले.