मॉरिस नारोन्हा बलात्कार प्रकरणाची विशेष चौकशी व्हावी.!

मॉरिस नारोन्हा बलात्कार प्रकरणाची विशेष चौकशी पथकाद्वारे पुनश्च चौकशी करा - अजय सिंह सेंगर

मुंबई (जगदीश काशिकर) :  खासदार संजय राऊत हे देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध कारण नसताना आग ओकत आहे. मॉरिस व घोसाळकर याच्या आपसी वादातुन हत्याकांड झाले.अभिषेक घोसाळकरने कट कारस्थान रचून मॉरिस नारोन्हा बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकविल्याने हत्याकांड घडले असे सर्वत्र प्रसारमाध्यमांमध्ये वृत्त प्रकाशित झालेले आहे.अभिषेक यांनी राजकारणामध्ये उद्धव ठाकरे ओळखीचा दबाव तंत्र वापरून मॉरिस विरुद्ध  महिलेला पोलीस घेऊन पोलिस स्टेशनला बलात्काराचा गुन्हा नोंदविला. याचा मॉरिशच्या मनात राग होता. तत्कालीन शिवसेनेच्या नेत्यांनी सुद्धा पोलिसावर दबाव टाकला होता.
या गुन्ह्याची त्वरित पुन्हा चौकशी करण्यात यावीत अशी मागणी "महाराष्ट्र करणी सेना" प्रमुख अजय सिंह सेंगर यानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रा द्वारे केलेली आहे.सेंगर पुढे म्हणतात की आपली न्यायव्यवस्था ही 100 अपराधी सुटले तरी चालेल पण एका निरपराधयाला शिक्षा नको व्हायला या वक्यावर आधारित आहे, म्हणून आपल्या देशातील सर्व राजकारणी गुन्हे करून जामिनावर बाहेर येऊन पुन्हा पुरावे नष्ट करायला तयार असतात आणि सामन्या माणूस जरी अपराधी नसेल तरी शिक्षा भोगत असतो कारण त्याला कायद्याचे हवे तेवढे ज्ञान नसते. जसे जास्त पैसे असले की महागाडे वकील येतात व ते वेगवेगळ्या पळवाटा शोधून गुन्हेगाराला अलगद गुन्ह्या मधुन बाहेर काढतात तसेच काहीसे होत आहे.
मॉरिस नारोन्हा बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्यात उबाठा गट कार्यरत होता.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.