हुकुमशाही विरोधी लढणाऱ्या निर्भय बनो आंदोलनाच्या नेत्यांवर झालेल्या खुनी हल्ल्याचा जाहीर निषेध !
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा : धनंजय रामकृष्ण शिंदे, आप महाराष्ट्र उपाध्यक्ष
हुकुमशाही प्रवृत्तींच्या विरोधात लढणारे ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे, सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी आणि ज्येष्ठ विधीज्ञ अँड. असिम सरोदे यांच्यावर काल पुण्यात झालेल्या खुनी आणि भ्याड हल्ल्याचा आम आदमी पार्टी कडून जाहीर निषेध !!
मुंबई (जगदीश काशिकर) : निर्भय बनो आंदोलनाच्या पुणे येथील सभास्थानाकडे जाताना ज्येष्ठ पत्रकार मा. निखिल वागळे, ज्येष्ठ विधीज्ञ अँड. असीम सरोदे आणि सहकाऱ्यांच्या गाडीवर काल खुनी, भ्याड हल्ला केला गेला. ही सभा उधळून लावण्याची धमकी सत्ताधारी भाजप शहराध्यक्षांनी जाहिरपणे दिली होती. त्याची समाजमाध्यमे आणि वर्तमानपत्रात बातमी सुद्धा आली होती. अशावेळेस पुणे पोलिसांनी मा. निखिल वागळे, मा. असीम सरोदे आणि सहकाऱ्यांना संरक्षण देणे आवश्यक होते. लोकशाही मार्गाने सभा घेण्याचा अधिकार भारतीय नागरिकांना असताना अशा प्रकारच्या दडपशाहीचा अवलंब भाजपा करताना दिसत आहे. हा हल्ला होऊ नये म्हणून प्रशासनाने संबंधितांना आधीच ताब्यात का घेतले नाही? आतातरी या सर्व भ्याड हल्लेखोरांना पुणे पोलिसांनी तात्काळ अटक करावी.
आम आदमी पार्टी या शासन पुरस्कृत दडपशाहीचा आणि गुंडांच्या फॅसिस्ट कृतीला अटकाव करण्यात असमर्थ ठरलेल्या शासनाचाही जाहीर निषेध करते. पोलिसांनी हल्लेखोरांवर तत्काळ कठोर कारवाई करावी तसेच गेले अनेक महिने राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरणाऱ्या गृहमंत्र्यांनी तात्काळ राजिनामा द्यावा अशी मागणी करत आहोत.