२४ वा वर्धापन दिन, पुस्तक प्रकाशन व पुस्तक लोकार्पण सोहळा संपन्न.!
भद्रावती (वि.प्र.) : झाडीबोली साहित्य मंडळ शाखा वरोरा चा २४ वा वर्धापन दिन तसेच आचार्य नागो थुटे लिखित "कवितेवर बोलू काही" व "उन्मेषांचे स्वागत" या पुस्तकांचे प्रकाशन व कवी रमेश बोपचे लिखित "शब्दयोगी" या पुस्तकाचे लोकार्पण कर्मवीर विद्यालय वरोरा येथील सभागृहात संपन्न झाले.
झाली बोली साहित्य मंडळ शाखा वरोराचा वर्धापन दिन तथा पुस्तक प्रकाशन सोहळा दिनांक १०/०२/२०२४ रोज शनिवारला कर्मवीर विद्यालय वरोराच्या सभागृहात उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.मदनराव ठेंगणे सर, ज्येष्ठ सल्लागार, झा.बो.सा.मं. वरोरा, विशेष पाहुणे तथा भाष्यकार मान. प्रा. डाँ. ज्ञानेश हटवार, साहित्यिक, सचिव वि.सा.संघ भद्रावती , प्रमुख पाहुणे मान. ना.गो.थुटे ज्येष्ठ साहित्यिक, वरोरा, मान. नरेंद्र बोरीकर मुख्याध्यापक कर्मविर विद्यालय वरोरा, मान. गिताताई रायपुरे, प्रसिद्ध निवेदीका, चंद्रपूर, मान. विजय पिंपळशेंडे, सदस्य, झा.बो.सा.मं. वरोरा, मान. दीपक शिव, सदस्य झा.बो.सा.मं. वरोरा , पंडित लोंढे अध्यक्ष, चंद्रशेखर कानकाटे, सचिव झा.बो.सा.मं.वरोरा हे मंचावर उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व मानवतेचे महापुजारी , वंदनीय, विश्वसंत तुकडोजी महाराज तसेच शिक्षणाच्या आद्य प्रवर्तक माॅ सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
झाडीबोली गौरव गीत व ना.गो थुटे लिखित "महाराष्ट्र गित" सु. वि. साठे, व संच यांनी वाद्यवृदांसह गायीले.
आचार्य ना गो थुटे व रमेश बोपचे यांच्या शाॅल व सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अध्यक्ष मदन ठेंगणे यांनी मनोगत व्यक्त करताना झाडीबोली साहित्य मंडळ वरोराची वाटचाल प्रेरणादायक आहे, असे मार्गदर्शन केले. प्रमुख पाहूने प्रा. डॉ ज्ञानेश हटवार यांनी 'उन्मेषांचे स्वागत' या पुस्तकावर भाष्य करताना "आचार्य नागो थुटे सरांनी नवोदित साहित्यिकांना सतत प्रेरणा देऊन योग्य मार्गदर्शन केले, त्यांचा परीसस्पर्श परिसरातील साहित्यिकांना झाला " असे सांगितले. विजय पिंपळशेंडे यांनी 'कवितेवर बोलू काही' या पुस्तकावर भाष्य केले. तर दीपक शिव यांनी 'रमेश बोपचे' यांच्या "शब्दयोगी" या काव्यसंग्रहावर भाष्य केले. आचार्य नागो थुटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक चंद्रशेखर कानकाटे सचिव झा.बो.सा.मं. वरोरा यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कवयित्री, सौ. निताताई बोढे वरोरा यांनी केले. तर आभारप्रदर्शन कवयित्री कु.आरती रोडे वरोरा यांनी केले.
दुसऱ्या सत्रात उपस्थित कवींचे खुले कवी संमेलन घेण्यात आले.
कवि संमेलनाचे अध्यक्ष सुभाषजी उसेवार ज्येष्ठ कवी, व्यंगचित्रकार, वरोरा, प्रा. डाॅ. सुधीर मोते कवी, भद्रावती , सुनिल बाबणे कवी, बल्लारशा, प्रविण आडेकर गझलकार भद्रावती हे मंचावर उपस्थित होते. उपस्थित २२ कवी महोदयांनी आपल्या बहाऊ कविता सादर करून रसिक, प्रेक्षकांचे मन जिंकले व बहारदार कवी संमेलन पार पडले. कवीसंमेलनाचे सूत्रसंचालन कवी गणेश पेंदोर,सदस्य झा.बो.सा.मं. वरोरा यांनी केले. तर आभारप्रदर्शन कवी जितेश कायरकर,सदस्य झा.बो.सा.मं. वरोरा, यांनी केले.
कार्यक्रमाचे अशी शेतीसाठी सर्व पदाधिकारी , सदस्य यांनी परिश्रम घेतले.