राहुल उमाळे मेमोरियल कान्व्हेंट अँड स्कूल, डायमंड नगर नागपूर येथील शाळेचे 2024 वार्षिक स्नेहसम्मेलन कार्यक्रम उत्साहात संपन्न .!
नागपुर (वि.प्र.) : राहुल उमाळे मेमोरियल कान्व्हेंट अँड स्कूल डायमंड नगर येथे शाळा संचालक श्री कपिलजी उमाळे यांच्या अध्यक्षतेत पुर्व नागपूर चे विकास पुरुष माननीय आमदार श्री कृष्णाजी खोपडे यांचे हस्ते कार्यक्रमाचे उदघाटन झाले.या प्रसंगी प्रमुख पाहुणे श्री अविनाशजी ठाकरे (माजी उपाध्यक्ष ओबीसीचे महामंडळ व माजी सत्ता पक्ष नेता मनपा) प्रमुख उपस्थिति होती.
तसेच श्री प्रमोदजी पेंडके गुरुजी (नागपूर चे भा.ज.पा.संपर्क प्रमुख) श्री कैलास जामगडे नागपूर (माजी प्रदेश सरचिटणिस अ. भा.माली महासंघ महाराष्ट्र राज्य) तसेच श्री सेतरामजी सेलोकर (भा.ज.पा.पुर्व मंडल अध्यक्ष) डॉ.रमणिक लेनगुरे सर (वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर कवी, विचारवंत, प्रसिद्ध समाजसेवक) राजुजी साकोरे, संजय बल्की आदि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थी व त्यांचे पालक मोठ्या संख्यानी उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीते करिता शाळेच्या मुख्यद्यापिका सह सर्व शिक्षिकांनी अथक परिश्रम घेतले.