५१ रक्तदात्यांनी रक्तदान केले .!
बल्लारपुर (का.प्र.) : दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा साई सरकार ग्रुप चे अध्यक्ष व भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष चंद्रपूर मोहीत डंगोरे यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक ०२/०२/२०२४ ला डॉ राजेंद्र प्रसाद वार्ड बल्लारपूर येथे भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले. या रक्तदान शिबिर मध्ये ५१ रक्तदात्यांनी रक्तदान करून महादान केलं. या रक्तदानाला जिल्हा रुग्णालय रक्तपेढीने सहकार्य केले यावेळी साई सरकार ग्रुप चे सदस्य निगम दुबे,प्रथम शेंडे,मनिष राजभर,निरज दुबे,अजवेंन्द्र दुबे, फारुक शेख, छोटू ठाकूर, शेख शकील, प्रणय कुंभिलवार,शिवम वाघमारे, गोपाल पासवान या सर्वांनी परिश्रम घेतले.