नागपुर (वि.प्र.) : आपल्या शिक्षणाचा उपयोग मानवतेसाठी व्हावा हा उद्देश घेवून समाजीक कार्य करणारे डाॅं. रमणिक एस. लेनगुरे, ग्रंथपाल, प्रसिद्ध विचारवंत, उत्कृष्ठ समाजसेवक,संशोधक, करीअर, स्पर्धा परिक्षा काॅन्सीलर व जाॅब प्राव्हाडर, नाविण्यपूर्ण उपक्रम राबविणारे ग्रंथपाल, वर्ड रिकाॅर्ड होल्डर कवी, कवी भुषण सन्मान प्राप्त, डि.लिट ने सन्मानीत, वाचन चळवळीचे पुरस्कर्त, प्रेरणादायी मागदर्शक, हेल्थ कोच तसेच विश्व मानवाधिकार संस्थेचे आंतरराष्ट्रीय सदस्य आहेत. ते ग्रंथालयाच्या लायब्ररी स्काॅलर नामक जरनलचे मुख्य संपादक असून अंत्यत प्रतिष्ठित मानल्या जाणा-या युजीसी केअर व स्कोपस इंडेक्सींग जरनलच्या संपादकीय मंडळात त्यांचा नावाचा समावेश आहे. त्यांना अनेक राज्यस्तरीय, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहे. त्यांचे विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परिक्षा, रोजगार व करीअर मार्गदर्शन संबंधित 2014 पासून खूप मोलाचे कार्य आहे. या संबंधीत कार्यासाठी अनेक सत्कार व त्यांची अनेक वर्ड बुक आॅफ रेकार्ड मध्ये नोंद घेण्यात आली आहे.
ते ग्रंथालयाच्या माध्यमातून वाचन संस्कृती रूजावी यासाठी ते नावीन्यपूर्ण उपक्रम राबवीत असतात. जसे थाॅट आॅफ द डे, हाॅस्पीटल लायब्ररी, वृद्धाश्रम ग्रंथालय, हेल्थ लायब्ररी, पब्लिक लायब्ररी, घडो विद्यार्थी, ग्रंथालयातून स्पर्धा परीक्षेकडे, एक विचार आपले जीवन बदलू शकतो, व्हावे त्यांच्या समान या संपूर्ण कार्यासाठी त्यांना नाविण्यपूर्ण उपक्रम राबविणारे ग्रंथपाल म्हणून वर्ड रेकार्ड्सनी गौरविण्यात आले आहे.
अश्या शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल राजा शिवछत्रपती प्रतिष्ठान, नागपूर व्दारे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्य दि. 19 फेब्रवारी 2024 रोजी छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक, गांधीगेट महाल, नागपूर येथे भव्य अश्या कार्यक्रमात त्यांच्या शैक्षणिक कार्याला गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमंत राजे मुधोजी भोसले तर प्रमुख पाहुणे म्हणून आ. मोहन मते, आ. प्रविण दटके, अति. पोलीस आयुक्त संजय पाटील, माजी आ. दिनानाथ पडोळे, माजी नगरसेविका हर्षला साबळे, कार्यक्रमाचे संयोजक मिलिंद येवले, तसेच अन्य इतरही मान्यवर उपस्थित होते. हा सन्मान मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.