बल्लारपूर (का.प्र.) : शहरातील विवेकानंद वार्ड झाशी राणी चौक येथील रुचिका बहुउद्देशीय सामाजिक संस्था बल्लारपूर व झाशी राणी सांस्कृतिक मंडळ बल्लारपूर तर्फे दरवर्षी विविध सांस्कृतिक व महापुरुषांच्या जयंती चे आयोजन करण्यात येत असते त्याच प्रमाणे या वर्षी सुध्दा रुचिका बहुउद्देशीय सामाजिक संस्था बल्लारपूर व झाशी राणी सांस्कृतिक मंडळ बल्लारपूर तर्फे विवेकानंद वार्ड झाशी राणी चौक येथे शिव छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली होती या वेळी या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून आशिषदादा देवतळे (महाराष्ट्र प्रदेश सचिव भाजपा युवा मोर्चा), प्रमुख पाहुणे म्हणून सौरभदादा मेनकुदळे (भाजपा युवा वि. आ. जिल्हा महामंत्री चंद्रपूर), सौ. सुमनताई कळसकर (अध्यक्षा रुचिका बहुउद्देशीय सामाजिक संस्था बल्लारपूर) हे उपस्थित होते, या कार्यक्रमाचे आयोजन रूचिका बहुउद्देशीय सामाजिक संस्था बल्लारपूर चे अध्यक्ष सौ. सुमनताई कळसकर, सचिव प्राची प्रदीप झामरे, रतन बांबोळे,प्रदीप झामरे, नागेश रत्नपारखी, अशोक मेश्राम, ॲड. सुमित आमटे, पुरूषोत्तम कळसकर, लिला कळसकर, झाशी राणी सांस्कृतिक मंडळ बल्लारपूर चे अध्यक्ष रोहन कळसकर यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामीण विकास बहुउद्देशीय संस्था बल्लारपूर चे अध्यक्ष गोंविदा वनकर, आकाश वाघमारे, रतन कवलकर,रिबिका जांभुळकर, वनश्री अलोने, लता वनकर, अशा मेश्राम , डेशी थॉमस, छाया मटाले व परिसरातील समस्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.