मराठा आंदोलनाचे अग्रेसर कार्यकर्ते योगेश केदार यांचे मनोगत.!

मुंबई (जगदीश काशिकर) : परम पूजनीय अदृश्य काड़सिद्धेश्वर स्वामीजींच्या( कणेरी मठ, कोल्हापूर) पवित्र सानिध्यात.... माझ्या कडे जे काही आहे ते अश्या महापुरुषांच्या संगतीत काही काळ शिकण्यात घालवता आल्यामुळे. त्याठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आले होते. दिवस भराचे त्यांचे कार्यक्रम आटोपून ते तिथे आले. मुख्यमंत्री साहेबांच्या सोबत देखील विविध विषयांवर चर्चा करता आली. स्वामीजींच्या बाबतीत शिंदे साहेबांची मोठी श्रद्धा असल्याचे दिसून आले.
मुख्यमंत्र्यांची भेट अत्यंत महत्वाच्या वेळी झाली. मागासवर्ग आयोगाचा अहवाल शासनाने स्वीकारला त्याच दुपारी सातारा सांगली कोल्हापूर येथील मराठा बांधवांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. येत्या 20 तारखेला अधिवेशन होणार आहे. त्या आधी मराठ्यांच्या मनातील प्रश्न त्यांच्या समोर मांडता आले. मनोज जरांगे पाटलांची तब्येत खालावली होती. ते उपोषण सोडवण्यासाठी त्यांनी पुढाकार घ्यावा यासाठी प्रामुख्याने भेटलो होतो. आदल्या रात्री फोन वरून विनंती केली अन् लगेच दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री मराठा समाजाला भेटायला तयार झाले हे विशेष. समाजातील वकील बांधवांनी तसेच अभ्यासकांनी गंभीर मुद्दे त्यांच्या समोर मांडले. 
मी त्यावेळी म्हणालो की 1881 ची जनगणना तसेच 1884 च्या गझेटियर बाबत बोललो. त्या आधारे तसेच 371(2) कलम आधारे मराठवाड्यातील सर्व मराठ्यांना ओबिसीत घेता येईल. अधिकारी वर्ग काही ठिकाणी दस्तावेज मिळवण्यासाठी हरकिरी करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले. हैदराबाद मधून 1900 सालच्या च्या पुढचेच दस्तावेज मिळवले गेलेत. त्या अधीचेही मिळवावे अशी विनंती केली होती ती साहेबांनी मान्य केली. मराठ्यांना मागास ठरवले गेलेच आहे. तर 50% च्या आतला कायदा केला जावा अशी मागणी आम्ही केली होती. बघू काय होतंय ते. सत्तेतले इतर पक्ष व नेत्यांच्या भूमिकांवर बरेच काही ठरणार आहे. बघू काय होतंय?

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.