भद्रावती येथील राष्ट्रीय लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत एआयजी क्रिकेट क्लब नागपूर विजयी .!

बक्षीस समारंभास भारतीय दिव्यांग क्रिकेट संघाच्या लोकेश मरघडेची प्रमुख उपस्थिती .!
एकूण 60 ते 70 रणजी क्रिकेट खेळाडूंचा सहभाग .!

भद्रावती (वि.प्र.) : लक्ष फाउंडेशन भद्रावती तर्फे स्वर्गीय पंजाबराव शिंदे स्मृती प्रित्यर्थ राष्ट्रीय टी२० लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात एआयजी क्रिकेट क्लब नागपूरने व्हाईट ऍश क्रिकेट क्लब चंद्रपूरचा पाच विकेट्सने पराभव करत विजेतेपद पटकावले. पहिले फलंदाजी करीत व्हाईट ऐश क्रिकेट क्लबने १४९ धावांचे लक्ष ठेवले होते. शेवटच्या षटकात एआयजीने विजय प्राप्त केला. स्पर्धेत एकूण ६० ते ७० रणजी खेळाडूंचा विविध संघाकडून सहभाग होता. सामने पाहण्यासाठी भद्रावती करांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
सुरुवातीला प्रमुख अतिथींच्या हस्ते कबुतरे सोडून प्रेम तथा एकात्मतेचे दर्शन घडविण्यात आले.कार्यक्रमाच्या बक्षीस वितरणाचे प्रमुख अतिथी म्हणून भारतीय दिव्यांग क्रिकेट संघाचे विकेट किपर बॅट्समन लोकेश मरघडे, नागपूर हे उपस्थित होते.
प्रमुख अतिथी म्हणून चांदा शिक्षण प्रसारक मंडळ चंद्रपूरचे सचिव तथा ओबीसी नेते डॉक्टर अशोक जीवतोडे, कृषी उत्पन्न बाजार समिती वरोराचे सभापती डॉ. विजय देवतळे, लक्ष फाऊंडेशनचे सदस्य प्रशांत शिंदे,शिवसेना (उबाठा) गटाचे वरोरा भद्रावती चे प्रमुख रविंद्र शिंदे, राष्ट्रवादीचे मुनाज शेख, डॉक्टर धनराज आस्वले,डॉक्टर कुटेमाटे, लक्ष फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप शिंदे , सचिव सुनील महाले, भाजपाचे सुनील नामोजवार, अविनाश पारोदे, रोहन कुटेमाटे, समीर बल्की, नकुल शिंदे, समीर बलकी , सचिन सरपटवार,अफजल भाई व अन्य सदस्य व्यासपीठावर उपस्थित होते.
विजेत्या संघास दोन लाख अकरा हजार रुपये रोख व ट्रॉफी तसेच उपविजेत्या संघास एक लाख अकरा रुपये रोख व ट्रॉफी बक्षीस स्वरूपात देण्यात आले.मॅन ऑफ द सिरीज चे बक्षीस अजहर शेख,बेस्ट बॅट्समन मनीष आऊजा, बेस्ट बॉलर अजहर शेख, बेस्ट विकेटकीपर ऋषी नाथानी, बेस्ट फिल्डर अनिरुद्ध, मॅन ऑफ द मॅच अंतिम सामना अनिरुद्ध अशा प्रकारे व्यक्तिगत बक्षीस देण्यात आली. अंपायर म्हणून मोहम्मद फारूक कुरेशी व अमन श्रीवास्तव तसेच कॉमेंट्रीटर परवेज राजा, इजाज सर व स्कोरर प्रशिक लांडगे उपस्थित होते.
स्पर्धेचे आयोजन दिनांक ७ ते १८ फेब्रुवारी पर्यंत पिपराडे मैदान चंद्रपूर -नागपूर रोड येथे करण्यात आलेले आहे होते.या स्पर्धेत देशातील जबलपूर, लखनऊ, इटावा, बेंगलोर तेलंगणा तसेच राज्यातील जळगाव, नागपूर,चंद्रपूर येथील नामांकित क्रिकेट संघ संघांनी सहभाग घेतला होता. यामध्ये अनेक नामांकित क्रिकेटपटूंचा समावेश होता .कार्यक्रमाचे संचालन सचिन सरपटवार तर आभार संदीप शिंदे यांनी मानले.
भारतीय दिव्यांग क्रिकेट खेळाडू लोकेश मरघडे यांची उपस्थिती :
बक्षीस वितरण प्रसंगी भारतीय दिव्यांग क्रिकेट संघाचे खेळाडू लोकेश मरघडे प्रामुख्याने उपस्थित होते. नुकत्याच झालेल्या भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यात त्यांची निवड करण्यात आली होती. हा सामना भारताने तीन_ दोन ने जिंकला होता. सामन्या दरम्यान प्रभावित होऊन इंग्लंडच्या जॉर्ज बटलरने आपली स्वतःची कीपिंगची किट लोकेश यांना दिली होती. लोकेश मरगडे यांची उपस्थिती नवोदित खेळाडूंना प्रेरणादायी ठरली.
या संपूर्ण स्पर्धेसाठी लक्ष फाउंडेशनचे प्रशांत शिंदे, अध्यक्ष संदीप शिंदे, रोहन कुटेमाटे, सुनील महाले, समीर बलकी, नकुल शिंदे, सचिन सरपटवार, अफजल खान, प्रदीप खंगार, सुयोग बल्की, सुहास वाढई, सतीश कवराती, कामरान खान, मिलिंद ठाकरे, शुभम निरगुडवार, विनायक माडोत, निखिल कुत्तरमारे, अजित अवतारे, शाहिद शेख, कुंदन चौधरी, सौरभ राव, यश, थूल, केतन तिडके, श्रेयस, गोलू, हर्षल यांनी परिश्रम घेतले.

छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती संपन्न .!

"रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार अंगिकारण्याची गरज" प्राचार्य डॉ जयंत वानखेडे यशवंतराव शिंदे विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण व पूजन करून झाली.
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या कार्यक्रमासाठी अध्यक्ष प्राचार्य डॉ जयंत वानखेडे, प्रमुख अतिथी प्रा. डॉ सुधीर मोते, प्रा. डॉ ज्ञानेश हटवार व्यासपीठावर उपस्थित होते. अध्यक्षीय मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ जयंत वानखेडे यांनी "छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार कृतीत उतरवण्याची आज समाजाला आवश्यकता असल्याचे मार्गदर्शन केले". तर डॉ. ज्ञानेश हटवार यांनी मार्गदर्शन करताना " छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याणकारी राज्याची स्थापना करत असताना सर्वसामान्य जनतेचे हित लक्षात घेतले" असे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ सुधीर मोते यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. किशोर ढोक यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. राकेश आवारी यांनी केले. कार्यक्रमाला प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येत उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी रवी देऊरकर, अशोक पिदुरकर, कवडू पोलेवार यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.