बल्लारपुर (का.प्र.) : आंबेडकरी युथ बल्लारपूर द्वारा आयोजित मातोश्री रमाई आंबेडकर यांची १२६ वी जयंती तिन दिवस (७,१०,११ फरवरी) मोठ्या उत्साहात व आनंदमय वातावरणात पार पाडली. बल्लारपूरातील आंबेडकरी युवक व युवतींनी एकत्र येउन मातोश्री रमाई आंबेडकर यांच्या जयंती निमित्त तीन दिवसीय भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.दि. ७ फेब्रुवारी ला भव्य मिरवणूक व मानवंदना देण्यात आली त्यात रॅलीची सुरुवात शगुन लाॅनच्या बाजुला असलेल्या पटांगणापासुन झाली. मिरवणूकीत मुख्य आकर्षण म्हणजे आंबेडकरी युवतींनी मोठ्या संख्येत लेझीम खेळत व ढोल वाजवत आपला आनंद व्यक्त केला, रॅलीचे समापन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला हार चढवून आणि मानवंदना देऊन करन्यात आले.
दि. १० फेब्रुवारी ला सकाळी ६ वा. महिलांकरीता मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली होती त्यात ३० ते ४० महिलांनी भाग घेत उत्कृष्ट असा प्रतिसाद दिला. त्यानंतर दुपारी ११ वा. महिलांचे कबड्डी व खो खो चे सामने घेण्यात आले. त्यात कबड्डी मधे सिद्धार्थ वार्डच्या महिलांनी बाजी मारली तर खो खो मधे गौरक्षन वार्ड बल्लारपूरच्या महिलांनी बाजी मारली. सायंकाळी ८ वा. सिने अभिनेत्री प्रियंका उबाळे परभणी यांचा मी रमाई हा एकपात्री चित्रपट पडद्यावर दाखविन्यात आला. रमाईच्या जिवनावर अत्यंत प्रभावी असा चित्रपट पाहता महिला भावुक झाल्या.आद. प्रियंका उबाळे यांचे आंबेडकरी युथ कडुन प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देत सत्कार करण्यात आले, त्याच वेळी हम सब एक है अशी आंबेडकरी युथने गर्जना केली. दि. ११ फेब्रुवारीला सायंकाळी ७ वा. आद. भंतेजी धम्मघोष मेत्ता यांच्या हस्ते त्रिशरण पंचशिल घेण्यात आले. त्यानंतर जिंकलेल्या खेळाडूंना भंतेजींच्या हस्ते बक्षीस व प्रमाणपत्र वितरण करन्यात आले.
त्यानंतर आद. भंते धम्मघोष मेत्ता यांना त्यांच्या उत्कृष्ट समाजकार्यासाठी त्यांना आंबेडकरी युथच्या वतीने गौरविण्यात आले. बल्लारपूर शहराला नव्यानेच लाभलेले नवनिर्वाचित पोलिस निरीक्षक आसिफ राजा शेख यांचे बल्लारपूर शहरात मशाल रॅलीने स्वागत करण्यात आले. मा. पोलिस निरीक्षक साहेबांनी महापुरुषांच्या जिवनावर प्रकाश टाकित संभाषण केले. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले त्यात लहान लहान मुलींनी खुप सुंदर असे रमाई व बाबासाहेबा यांच्या जिवनावर आधारीत नृत्य सादर केले. त्यानंतर लगेचच आंबेडकरी युथ च्या युवक युवतींनी म्हणजेच आयोजक टिमने प्रबोधनात्मक गिते सादर करत आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी कसे काम करावे यावर प्रकाश टाकला. असा हा ३ दिवसांचा सुंदर कार्यक्रम आंबेडकरी युथ बल्लारपूरच्या माध्यमातून घेण्यात आला त्यामागचा उद्देश असा होता कि बल्लारपूरातील संपूर्ण युवा एकत्र करने व चळवळीत प्रत्येकाला सहभागी करुन घेणे सोबतच महिलांनी घराबाहेर येऊन चळवळीत भाग घ्यावा.
कार्यक्रमाच्या यशस्वितेकरीता आंबेडकरी चळवळीतील दिक्षा धोंगडे, ऍड. प्रियंका चव्हाण, संकुल झाडे, स्वाती धोंगडे,प्रियंका दुपारे, श्रेया वाळके, कशिश वेले, क्षितिज खैरकर, प्रणिकेत रायपुरे, अमर धोंगडे, गोलु डोहने, अजित पडवेकर, सुमित नगराळे, शशिकांत निरांजने, सिमरन खोब्रागडे, मयुर आमटे, धम्मा मुन ,सुदेश सिंगाडे, अक्षय मुन,बादल ताकसांडे, प्रिन्स मेश्राम, अंकीत रामटेके यांनी मेहनत घेतली.