मुंबई (वि.प्र.) : मराठी चित्रपटसृष्टीचा आधार म्हणजे निर्माता एक चित्रपट निर्माता अनेक कुटुंबांचा पालक असतो. आज आपल्या पालकांचे अस्तित्व टिकवणे प्रत्येक कलाकर्मी यांचे कर्तव्य आहे.
यासाठी आपण दादासाहेब फाळके यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी हिंदमाता चौक, दादर स्टेशन (पूर्व) जवळ, मुंबई येथे दि. 30 एप्रिल 2024 रोजी सकाळी 9 ते 1 पर्यंत हजेरी लावावी.
करोनाच्या महामारी पासून चित्रपट व्यवसायात प्रचंड मंदी आली आहे त्यामुळे प्रत्येक कलाकर्मी हतबल झाला आहे.
आपण अनुदान अपात्र मराठी चित्रपटांना पात्र करून घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडे विनंती करत आहोत.
ज्या मराठी चित्रपटाचे अनुदान नाकारले आहे त्या निर्मात्यांनी अपात्रेचे पत्र घेऊन हजर रहावे.
चित्रपट व्यवसायातील अनेक कलाकर्मी आपल्याला सपोर्ट देण्यासाठी येत आहेत.
तुम्हीही या..!
अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळ .!