राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ,भद्रावती ची नवीन कार्यकारिणी नियुक्त.!

राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ,भद्रावती च्या अध्यक्ष पदी प्रा. डाॅ. ज्ञानेश हटवार सर तर उपाध्यक्ष पदी मनोज मोडक यांची नियुक्ती.!

भद्रावती (वि .प्र.) - आज दि 10/05/2024 ला राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ, भद्रावती जि.चंद्रपूर ची हाॅटेल सनी पाॅइंट भद्रावती येथे बैठक आयोजित करण्यात आली. त्यात सर्वानूमते नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली असून राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ, भद्रावती च्या अध्यक्षपदी प्रा. डाॅ. ज्ञानेश हटवार सर यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्ष पदी मनोज मोडक, सचिव प्रवीण चिमूरकर, कोषाध्यक्ष- शिरीष उगे, संपर्क प्रमुख- हर्षल रामटेके, प्रसिद्धीप्रमुख- आशिष कोटकर, सदस्य म्हणुन उमेश कांबळे यांची निवड करण्यात आली.
नवनियुक्त अध्यक्ष प्रा. डाॅ.ज्ञानेश हटवार सर यांच्या मार्गदर्शनात पुरोगामी पत्रकार संघ, भद्रावती च्या वतीने नवीन शैक्षणिक वर्षांत ग्रामीण भागातील जि.प. शाळेतील मुलांना शालेय साहित्य वितरण करण्याचे ठरविण्यात आले.
पुरोगामी पत्रकार संघाचा विस्तार व पुरोगामी पत्रकार संघ सामान्य जनतेचा बुलंद आवाज म्हणुन ओळख निर्माण करेल असा निश्चय नवनियुक्त अध्यक्ष प्रा. डाॅ. ज्ञानेश हटवार सर यांनी व्यक्त केला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.