बल्लारपुर (का.प्र.) : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या पुण्यभूमीत सतत तीस वर्षांपासून आदरणीय स्व. डॉ ऊध्दवराव गाडेकर दादा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेला ज्ञानदानाचा महायज्ञ म्हणजेच बाल सुसंस्कार शिबीर. या शिबीराची धुरा अगदी लहान वयात आपल्या खांद्यावर लीलया पेलणारे ह.भ.प. शुकदास महाराज गाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली यावर्षी सुध्दा २ मे २०२४ पासून एक महिना चालणाऱ्या बाल सुसंस्कार शिबीरास सुरवात झाली असून संस्कार शिबीर म्हणजे काय हे जाणुन घेण्यासाठी शिबीरास विदेशातुन भारत भ्रमण करीता आलेल्या तज्ञ लोकांनी या शिबीरास स्वयंस्फूर्तीने भेट दिली. तसेच या शिबीरास राजकीय पदाधिकारी व शासनातील अनेक वरीष्ठ अधिकारी सुध्दा दरवर्षी भेट देऊन जवळ जवळ सतरा ते अठरा जिल्ह्यातुन येणाऱ्या विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतात.त्याचप्रमाणे फुल नाही, फुलाची पाकडी म्हणून का होईना माझ्या अल्पबुध्दीने दरवर्षी शक्य होईल तेवढे मी डॉ. रतनलाल तायडे भोई ह्या शिबीरास दरवर्षी हजर असणाय्रा जवळ जवळ पाचशे ते साडेपाचशे विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करुन गुरुदेवा चरणी सेवा अर्पण केली. जय गुरू, जय भोईराज.