नटखट नाटकवाडी हे पुस्तक सामाजिक जाणीव जागृती करणारे... सदानंद बोरकर

भद्रावती (वि.प्र.) : भद्रावती येथील साहित्यिक, सेवानिवृत्त मुख्याध्यापक शालिक दानव सर लिखित नटखट नाटक वाडी या बालनाट्यसंग्रहाचे प्रकाशन व लोकार्पण आज दिनांक 1/6/2024 रोज शनिवार ला ज्येष्ठ रंगकर्मी, लेखक, चित्रकार, प्राचार्य सदानंद बोरकर नवरगाव व ना. गो. थुटे सर ज्येष्ठ साहित्यिक वरोरा, नरेशकुमार बोरीकर , आर्श चावरे यांच्या हस्ते मुरलीधर पाटील गुंडावार सभागृह सब्जी मार्केट भद्रावती येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
भद्रावती येथील साईप्रकाश कला अकादमी व बालकुमार फन अँड लर्न द्वारे आयोजित उन्हाळी सुट्टी विशेष शिबिरा चा समारोप कार्यक्रम संपन्न झाला . समाजसेवक, सेवानिवृत्त मुख्याध्यापक, सामाजिक कार्यकर्ते शालिक दानव सर द्वारा लिखित नटखट नाटकवाडी या बालनाट्यसंग्रहाचे प्रकाशन व लोकार्पण आज श्री मुरलीधर पाटील गुंडावार सभागृह सब्जी मार्केट भद्रावती येथे संपन्न झाले. या कार्यक्रमाचे उद्घाटक ज्येष्ठ रंगकर्मी, प्रसिद्ध लेखक व चित्रकार, प्राचार्य सदानंद बोरकर सर नवरगाव यांचे हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष झाडीबोली साहित्य मंडळाचे मार्गदर्शक आचार्य ना. गो. थुटे सर ज्येष्ठ साहित्यिक वरोरा हे होते . नटखट नाटक वाडी या बालनाट्यसंग्रहावर भाष्यकार म्हणून नरेशकुमार बोरीकर लेखक, नाट्यकर्मी व अध्यक्ष फिनिक्स साहित्य चंद्रपूर यांनी नटखट नाटकवाडी या पुस्तकावर भाष्य केले. प्रमुख अतिथी म्हणून बालकलाकार, शास्त्रीय तथा सुगम संगीत गायक आर्श चवरे वर्धा याने सुंदर गाणं करून उपस्थितांचे मन जिंकले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनोद ठमके सर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा डॉ ज्ञानेश हटवार यांनी केले तर आभार प्रदर्शन क्षितीज शिवरकर यांनी केले.
पुस्तक प्रकाशन सोहळा व चित्र व हस्तकला प्रदर्शनीचे उद्घाटन झाल्यानंतर दुसऱ्या सत्रात बालकुमार फन अँड लर्न या विशेष शिबिराचे समारोपिय कार्यक्रम सुद्धा याच सभागृहात पार पडले. लहान बालकांनी आपले कला प्रदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेक महाकाळकर यांनी केले.
या कार्यक्रमाला साहित्य प्रेमी, कलाप्रेमी, पालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी. विवेक महाकारकर, श्रीकांत भिडीकर, सचीन बेरडे, हर्षदा हिरादेवे, किरण वानखेडे, सांची गणवीर, परी नागपूरे, श्रावणी शिवरकर, मोहीत भगत, राज येरणे साई कलाप्रकाश अकादमी भद्रावती च्या पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.