विविध कार्यक्रमांनी स्व.निळकंठराव शिंदेचा ८२ वा जयंत्योत्सव साजरा .!

 गुणवंतांचा व सेवानिवृत्ती सत्कार तसेच वृक्षारोपण संपन्न.!

भद्रावती (वि.प्र.) : भद्रावती तालुक्यात शिक्षणाची दारे सर्वसामान्यांसाठी ऊपलब्ध करणारे भद्रावती शिक्षण संस्था भद्रावतीचे संस्थापक सचिव, माजी आमदार स्व. निळकंठराव शिंदे यांचा ८२ वा जयंती उत्सव यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालयाच्या सभागृहात संपन्न झाला. या प्रसंगी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. 
यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती येथे भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती संस्थेचे संस्थापक सचिव तथा माजी आमदार स्वर्गीय नीलकंठराव शिंदे यांच्या जयंतीनिमित्त शैक्षणिक सत्रात २०२३-२४ मध्ये महाविद्यालयातून गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त प्राचार्य एम.यु्. बरडे सर यांचा सत्कार मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ विवेक शिंदे , अध्यक्ष , भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. कार्तिक शिंदे , सचिव, डॉ. विशाल शिंदे , सहसचिव , वरीष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ हेमराज लडके, प्राचार्य डॉ जयंत वानखेडे, सत्कारमूर्ती एम.यु. बरडे सर व्यासपीठावर उपस्थित होते.
यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातून या वर्षी तीन विद्यार्थ्यांनी आय आय टीत प्रवेश निश्चित केला. तसेच विविध वीद्याशाखेत प्राविण्य प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला. प्राचार्य एम यु बरडे सर यांचा सेवानिवृत्ती प्रित्यर्थ कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ विवेक शिंदे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, भेट वस्तू देऊन त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. साहेबांच्या जयंती प्रित्यर्थ महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले व प्रत्येक वृक्षाच्या संगोपणाची जबाबदारी सोपवण्यात आली.
सत्काराला उत्तर देताना सेवानिवृत्त प्राचार्य एम यु बरडे सर यांनी स्वर्गीय नीळकंठराव शिंदे साहेब यांनी प्रतिकूल परिस्थितीत सामान्य जनतेसाठी शिक्षणाचे व्यवस्था उपलब्ध करून दिली. त्यांनी आम्हाला कठोर प्रशिक्षण देऊन विद्यादानाच्या कार्यासाठी तत्पर केल्याचे सांगितले . अध्यक्षीय मार्गदर्शन करताना डॉ विवेक शिंदे यांनी " मानवाची ओळख ही त्याच्या कर्तुत्वाने होत असते. आपण साहेबांची प्रेरणा घेऊन कर्तृत्व संपन्न व्हावे, असा आशावाद व्यक्त केला. "
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. जयंत वानखेडे सर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ सुधीर मोते यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राध्यापक किशोर ढोक यांनी केले.
कार्यक्रमाला भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती द्वारा संचालित महाविद्यालय, विद्यालय, प्राथमिक शाळा येथील विद्यार्थी, पालक, समस्त मुख्याध्यापक, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक , शिक्षक , शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.