भद्रावती (वि.प्र.) : गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली हे आदिवासी बहुल गडचिरोली व चंद्रपूर या दोन जिल्हाचा विकास साधण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाद्वारे सन २०११ मध्ये स्थापित राज्य विद्यापीठ आहे. हे दोन जिल्हे वन व खनिज संपदेने विपुल आहेत या संपदेचा वापर करुन या जिल्हयातील लोकांच्या जिवनात समृध्दी आणण्याचा प्रयत्न गोंडवाना विद्यापीठ करीत आहे, व त्यादृष्टीने नव नविन कोर्सेस सुरु करण्या करिता विद्यापीठ प्रयत्नशिल आहे.
त्याचाच एक भाग म्हणून गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली ची चार सदस्सीय टिम विद्यापीठाचे कुलगुरु माननिय प्रशांत बोकारे यांच्या अध्यक्षतेखाली करटीन विद्यापीठ पर्थ वेस्टर्न आस्ट्रेलीया च्या विज्ञान व अभियांत्रिकी विभागास भेट देण्यास दिनांक ०६/०७/२०२४ ला गेले आहेत. या टिममध्ये अधिसभा सदस्य, माजी व्यवस्थापन परिषद सदस्य व भद्रावती शिक्षण संस्था भद्रावतीचे अध्यक्ष डॉ. विवेक नि. शिंदे तसेच श्री. स्वप्नील दोन्तुलवार, अधिसभा व व्यवस्थापन परिषद सदस्य व श्री. प्रशांत मोहीते व्यवस्थापन परिषद सदस्य यांचा अंर्तभाव आहे. या अभ्यास दौ-या दरम्यान गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली व करटीन विद्यापीठ ऑस्ट्रेलीया यांच्यात सामंजस्य करार व दोन विद्यापीठामध्ये सहयोग वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न होणार आहेत तसेच करटीन विद्यापीठातील विविध विभागांना भेटी देवून त्यातील काही उपक्रम आपल्या विद्यापीठात सुरु करता येतील काय यावर सुद्धा विचार केला जाणार आहे.
करटीन विद्यापीठ पर्थ वेस्टर्न आस्ट्रेलीया या जागतिक ख्यातीच्या विद्यापीठाशी आपल्या विद्यापीठाचा सहयोग निर्माण करणा-या टिम मध्ये शैक्षणिक व सामाजिक कार्याचा अनुभव असलेले व समाजाच्या उत्थानासाठी अविरत प्रयत्नशिल व पेशाने शल्य चिकीत्सक असलेले डॉ विवेक नि शिंदे यांची वर्णी लागणे ही गोंडवाना विद्यापीठाशी संबधीत सर्वासाठी आनंदाची बाब आहे निश्चितच त्यांच्या ज्ञानाचा व अनुभवाचा फायदा करटीन विद्यापीठ भेटी दरम्यान गोंडवाना विद्यापीठाला होणार आहे डॉ. विवेक नि शिंदे यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन केल्या जात आहे.