किशोर खंडाळकर अध्यक्ष तर आत्माराम देशमुख सचिव.!
भद्रावती (वि.प्र.) : रोटरी क्लब भद्रावती तसेच इनरव्हिल क्लब भद्रावती यांचा संयुक्त पदग्रहण सोहळा दिनांक ३१जुलै २०२४ ला सेलिब्रेशन सभागृह भद्रावती येथे मोठ्या थाटात संपन्न झाला.
या सदग्रहण सोहळ्याचे अध्यक्ष रोटेरी अरुण कावडकर ए जी डिस्ट्रिक्ट ३०३० तर प्रमुख अतिथी रोटेरी रमा गर्ग डिस्ट्रिक्ट व्हॉईस चेअरमन ३०३० ह्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी रोटरी क्लबचे मावळते अध्यक्ष अनिल धानोरकर यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष किशोर खंडाळकर यांना पदभार सोपविला तर मावळते सचिव सुधीर पारधी यांनी नवनिर्वाचित सचिव आत्माराम देशमुख यांना पदभार सोपविला. यावेळी हनुमान घोटेकर हे कोषाध्यक्ष तर विक्रांत बिसेन ह्याची प्रोजेक्ट डायरेक्टर म्हणून निवड करण्यात आली.
इनरव्हील क्लब भद्रावतीचा सुद्धा पदग्रहण सोहळा संपन्न झाला. यात मावळचे अध्यक्ष स्वाती चारी यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष सौ प्रेमा पोटदुखे यांना पदभार सोपविला, तर मावळत्या सचिव प्रेमा पोटदुखी यांनी नवनियुक्त सचिव सुनंदा खंडाळकर यांना पदभार सोपविला.
याप्रसंगी उपस्थितांना अध्यक्षीय मार्गदर्शनातून " रोटरी क्लब हे समाजसेवेसाठी कार्यरत आहे, भद्रावतीचा रोटरी क्लब हा समाजसेवी कार्यात अग्रेसर असल्याचे अरुण कावडकर यांनी सांगितले. यावेळी मावळते अध्यक्ष यांनी आपल्या कार्यकाळात केलेल्या उपक्रमाचा उल्लेख केला , तर नवीन अध्यक्ष यांनी नियोजित उपक्रम घेणार असल्याचे विश्वास व्यक्त केला. यावेळी ५ नविन सदस्यांनी रोटरी क्लब भद्रावतीचे सदस्यत्व स्वीकारले व ३ नविन सदस्यांनी इनरव्हील क्लब भद्रावतीचे सदस्यत्व स्वीकारले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य सचिन सरपटवार यांनी केले तर आभार प्रदर्शन सुधीर पारधी यांनी केले. कार्यक्रमाला रोटरी क्लब वणी चे अध्यक्ष, माजी अध्यक्ष, सदस्य , रोटरी क्लब भद्रावतीचे सदस्य, इनरव्हील क्लबचे भद्रावतीचे सदस्य, पत्रकार , प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.