बल्लारपुर (का.प्र.) : भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती द्वारा संचालित यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चिचोर्डी भद्रावती येथे ७८ वा भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला .
यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चिचोर्डी भद्रावती, नीलिमाताई शिंदे महिला महाविद्यालय भद्रावती, डॉ विवेक शिंदे प्रशासकीय सेवा महाविद्यालय भद्रावती, यशवंतराव शिंदे प्राथमिक विद्यालय चिचोर्डी भद्रावती यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंतराव शिंदे विद्यालयाच्या प्रांगणात ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. भद्रावती शिक्षण संस्था भद्रावतीचे सचिव प्रा. डॉ. कार्तिक शिंदे यांच्या हस्ते सकाळी ८.०५ ला ध्वजारोहण करण्यात आला.
याप्रसंगी व्यासपीठावर अध्यक्ष प्रा. डॉ कार्तिक शिंदे, सचिव भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती, प्रमुख अतिथी प्राचार्य डॉ. लडके, प्राचार्य डॉ जयंत वानखेडे, माजी प्राचार्य मा. उ. बरडे उपस्थित होते. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी देशभक्ती गीत गायन तसेच मनोगत व्यक्त केले.
यावेळी मार्गदर्शन करताना सचिव प्रा. डॉ कार्तिक शिंदे यांनी "हजारो शूरवीरांच्या हौतात्म्यातून भारताला स्वातंत्र्य प्राप्त झाले, स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे ही बाब लक्षात ठेवून भारताला उन्नत करण्यात भारतीयांनी योगदान द्यावे" असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ जयंत वानखेडे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ सुधीर मोते यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. किशोर ढोक यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले. याप्रसंगी पालक विद्यार्थी मोठ्या संख्येत उपस्थित होते.
