बल्लारपुर (का.प्र.) : कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघ महाराष्ट्र राज्य या शासनमान्य नोंदणीकृत संघटनेची नवीन कार्यकारणी ची निवड नुकतीच जाहीर करण्यात आली. नुकतीच महाराष्ट्रातील मराठी विषय शिक्षक महासंघाची आभासी पध्दतीने सभा घेण्यात आली. त्यात राष्ट्रीय कनिष्ठ महा मांढळचे मराठी विभागप्रमुख प्रा.सुरेश गोविंदराव नखाते यांची नागपूर जिल्हाध्यक्ष व नागपूर जिल्हा प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली. संघटनेचे अध्यक्ष प्रा सुनील डिसले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आभासी बैठकीत सचिव प्रा बाळासाहेब माने यांनी नवीन कार्यकारिणी जाहीर केली.
या महासंघाच्या वतीने मराठी भाषा विषयातील शिक्षकांच्या समस्या, अध्ययन अध्यापन करताना येणाऱ्या अडचणी या संघटनेच्या माध्यमातून सोडवल्या जाऊन, मराठी भाषा विषय हा महाराष्ट्रात इयत्ता बारावी पर्यंत सर्व विद्याशाखेत सक्तीचा व्हावा. मराठीला कुठल्याही विषयाचा पर्याय असता कामा नये, ही महासंघाची भूमिका आहे. यासाठी शासन स्तरावर, प्रशासकीय स्तरावर संघटनेच्या माध्यमातून अनेक पत्र व्यवहार झाले.
संघटनेच्या घटनेप्रमाणे दर तीन वर्षांनी राज्य कार्यकारणीची निवड करून कार्यकारिणी घोषित करण्यात येते. सन २०२४ ते २०२७ या तीन वर्षाच्या कालावधीसाठी कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघाची नवीन राज्य कार्यकारणी बाळासाहेब माने यांनी घोषित केली.
प्रा सुरेश गोविंदराव नखाते हे प्राध्यापक म्हणून मागील १९ वर्षापासून कार्यरत आहेत. मागील पाच वर्षाच्या कार्यकारणीत ते नागपूर जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम करत होते. या कालावधीत त्यांनी मराठी विषय शिक्षकांना संघटित करून विषय शिक्षकांच्या समस्या, अध्ययन अध्यापनातील येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न केले. मागील वर्षी त्यांनी मराठी विषय शिक्षक महासंघाचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन आनंदवन, वरोरा, जिल्हा चंद्रपूर येथे यशस्वीरित्या संपन्न करण्यासाठी महत्वाचे सहकार्य केले. ते विदर्भ साहित्य संघ शाखा मांढळचे ते कार्यक्रम प्रमुख आहेत.
अनेक सामाजिक संस्था व साहित्यिक चळवळीत ते सहभागी असतात. अशा बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा उपाध्यक्ष डॉ ज्ञानेश हटवार चंद्रपूर, कोषाध्यक्ष संजय लेनगुरे भंडारा, प्राचार्य दिलीप वानखडे, पर्यवेक्षक विजय गायधने, तेजराम ठाकरे, चेतन ठवकर, प्रा. विशाल कोत्तावार, सेवानिवृत्त प्राचार्य विजयराव ठाकरे, सेवानिवृत्त प्राचार्य राजेन्द्र कांबळे, ईश्वर ढेंगे ,सपन नेहरोत्रा, विदर्भ साहित्य संघ शाखा मांढळचे अध्यक्ष प्राचार्य डॉ अविनाश तितरमारे, सचिव राजीव बुद्धे कोषाध्यक्ष प्रा डाॅ रामेश्वर पाठेकर, उपाध्यक्ष संजय तिजारे, प्रा .वैशाली देशमुख, प्रा रवींद राठोड प्राध्यापक, पत्रकार व साहित्यिक मंडळी यांनी त्यांचे अभिनंदन केले. सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.