बल्लारपुर (का.प्र.) : महाराष्ट्रात कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघ मागील अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. कनिष्ठ महाविद्यालयीन स्तरावर मराठी विषय शिक्षकांचे सर्वात मोठे संघटन या संघटनेने केले आहे.
या महासंघाची महत्त्वपूर्ण सभा दिनांक ७ ऑगस्ट २०२४ ला सायंकाळी ८ वाजता आभासी पध्दतीने आयोजित केली आहे.
कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघ महाराष्ट्र राज्य या संघटनेची महत्त्वपूर्ण सभा दिनांक ७ ऑगस्ट २०२४ ला संध्याकाळी आठ वाजता आभासी पध्दतीने आयोजित केलेली आहे. या सभेला राज्याध्यक्ष सुनीलजी डिसले, बारामती , सचिव बाळासाहेब माने, मुंबई , कार्याध्यक्ष संपतराव गर्जे पुणे, उपाध्यक्ष डॉ प्रतीभा विश्वास मुंबई यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभणार आहे. या सभेला समस्त राज्य कार्यकारिणी सदस्य, मराठी विषय अभ्यास मंडळाचे सदस्य तसेच समस्त जिल्हा प्रतिनिधींनी या आभासी पद्धतीने आयोजित केलेल्या सभेला अवश्य उपस्थित रहावे.
या सभेत येवू घातलेल्या नवीन शैक्षणिक धोरणात मराठी विषयाचे महत्त्व, तसेच कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षकांचे दुसरे राज्यस्तरीय अधिवेशन व महत्त्वपूर्ण शैक्षणिक विषयावर विचार मंथन होणार आहे. तेव्हा समस्त राज्य कार्यकारिणीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व सर्वच जिल्हा प्रतिनिधींनी या सभेला आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन बाळासाहेब माने सचिव मराठी विषय शिक्षक महासंघ महाराष्ट्र राज्य व राज्य कार्यकारिणीने केले आहे.
