निरोप समारंभ संपन्न .!

पणज (वि.प्र,.) : महसूल विभागात प्रदिर्घ सेवा देऊन दिनांक ३१ जुलै २०२४ रोजी महसूल विभागातील पणज येथील मंडळ अधिकारी श्री.निळकंठराव नेमाडे हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले आहेत. त्याकरीता भोईराज कॅलेंडर निर्माता डॉ रतनलाल तायडे भोई तथा भोईराज परिवारातर्फे आज दिनांक ४ऑगस्ट २०२४ रविवारी भोईराज भवन भोईपुरा जवळ भोई समाज भवन येथे श्री. निळकंठराव नेमाडे साहेब यांचा सेवानिवृत्ती निमीत्ताने निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता त्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रसिद्ध उद्योजक विजयकुमार दातीर, तसेच प्रमुख अतिथी म्हणून देशोन्नती चे आकोट चे दबंग पत्रकार रामदासभाऊ काळे, तलाठी सोलकर,तलाठी बालाजी केंद्रे, सरपंच आकाश कोल्हे, मा.सरपंच प्रदीपसिंह ठाकूर, मा.उपसरपंच जावोद्दीन, विनायकराव शेंडे, अलताफ हुसेन,संतोष अस्वार,ओमप्रकाश शेंडे , कुमार जोत हे होते.नेमाडे मं. अ. यांचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन भोईराज परिवारातर्फे डॉ रतनलाल तायडे भोई, मा.तंटामुक्ती अध्यक्ष रामदासभाऊ तायडे,प्रदीपसिंह ठाकूर, विजयकुमार दातीर व सर्व गावकरी यांनी केला. कार्यक्रमाचे यशस्वीतेकरीता गजानन वि.नेमाडे,गोपाल नेमाडे, आकाश सावीकार, अंकीत देशमुख, डॉ.सुरज तायडे, निखिल साविकार, कैलास तायडे, डॉ.दर्शनकुमार तायडे, यांनी परिश्रम घेतले.आपल्या सत्काराला उत्तर देताना नेमाडे साहेब हे अत्यंत भावुक होऊन हा सत्कार माझा नसुन माझ्या सत्यनिष्ठेने केलेल्या कामाचा होय कारण "सत्य परेशान हो सकता है,परेशान नही " अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या. संचलन अनील रोकडे तर आभार प्रदर्शन डॉ मयुरदादा तायडे यांनी केले.


Post a Comment

Previous Post Next Post
clipboard. ".