बल्लारपूर (का.प्र.). विसापूर येथील चिंतामणी विद्यालयात शुक्रवारी (दि.30) आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
कार्यशाळेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून चिंतामणी कॉलेज ऑफ कॉमर्सचे विभागप्रमुख तथा गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली प्रमाणित आपत्ती व्यवस्थापन तज्ज्ञ प्रा. ओमप्रकाश सोनोने उपस्थित होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य प्रशांत दॉतुलवार उपस्थित होते.
कार्यशाळेत सोनोने यांनी आग, महापूर, भूकंप, भूस्खलन याप्रसंगी आपत्ती व्यवस्थापन कसे करावे याबाबत माहिती दिली. एखादा व्यक्ती पाण्यात बुडत असताना त्याला कसे वाचवावे याबाबत मार्गदर्शन केले.
कोणत्या उपाययोजना केल्या जाव्या याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. अग्निशमन यंत्राचा वापर कसा करावा याची माहिती दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी स्वतः प्रात्यक्षिक करून बघितले. संचालन सहाय्यक एखाद्या इमारतीच आग लागली तर कोण शिक्षिका सोनाली आत्राम यांनी केले तर आभार विकास कल्लूरवार यांनी मानले. कार्यक्रमासाठी अरुण टोंगे, शुभांगी बरडे, कृशागौतमी खोब्रागडे, संतोषी तगलपल्लेवार, श्रद्धा साखरकर मुन्ना पुंडे, रवी कोडापे यांनी मोलाचे सहकार्य केले.