निधन वार्ता .!

बल्लारपुर (का.प्र.) : महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. नगाजी यादवराव वटाणे यांचं आज दि.०१ सप्टेंबर रोजी दुपारी २:४५ वाजता वयाच्या ८५ वर्षी अल्प आजाराने राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुलं, तीन मुली, नातवंड असा बराच मोठा आप्त परिवार आहे. वैद्यकीय क्षेत्रासोबतच शैक्षणीक आणि सामाजिक क्षेत्रातही डॉ.वटाणे त्यांचं मोठ कार्य होत. ते स्वतः वैद्यकीय क्षेत्रात असल्यामुळे मृत्यू नंतर आपले मृत शरीर वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या उपयोगी पडावे, या उद्देशाने त्यांनी मरणोत्तर देहदान करण्याचा संकल्प केला होता. त्यांच्या इच्छेनुसार उद्या सोमवार दि ०२ सप्टेंबर रोजी सकाळी ९:३० वाजता राणी लक्ष्मी वार्ड येथील राहत्या घरी विधिवत अंत्य विधी आटोपल्यानंतर त्यांचं शरीर वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्वाधीन केले जाणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.