हॅलो निसर्ग
चराचरातील कणाकणाममध्ये
अगाध लीला तुझी पाहतो
दिव्य तुझ्या त्या दृश्य रुपाला
'निसर्ग ऐसे नाव लावतो !!
आज सकाळी जेव्हा मी उठले तेव्हा मला थोडी थंडी वाजत होती आणि वाटलं थोडा चहा घ्यावा. चहा करताना मी माझ्या मिस्टरांना विचारले हिवाळा सुरू झाला की काय तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर मला प्रश्नचिन्ह दिसले! ते सुद्धा उत्तर देऊ शकले नाहीत ते गोंधळात पडले आणि म्हणाले पावसाळा कधी संपला?? तेव्हा मनात विचार आला .अगदी लहानपणापासून शाळेत आम्ही शिकलो की ऋतू हे तीन प्रकारचे आहेत. पावसाळा, हिवाळा ,उन्हाळा आणि ते कोणत्या महिन्यात येतात हे सुद्धा आम्ही शिकलो पण सध्याचे ऋतू ,हवामान पहिले तर वाटतं जे शिकलो किंवा जे आपण आज पाहतोत ऋतूंच्या बाबतीत ते खरं आहे की नाही? हवामानात बदल ,ऋतूत बदल हा पृथ्वीवरचा होणारा परिणाम याला आपण सर्वच जबाबदार आहोत.
वाचक, हे तर तुम्हाला माहीतच असेल आपल्या लहानपणी एकदम हे ऋतुचक्र व्यवस्थित चालायचे म्हणून नेमका कोणता ऋतू चाललाय हे समजायचं आणि त्या ऋतूची एक महिन्या आधीच तयारी असायची.जसे जून महिन्यात शाळा सुरू होण्यापूर्वी शाळेच्या सामानासोबत छत्री, रेनकोट विकत घेत असू ;परंतु आता मात्र जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत कळतही नाही कधी पावसाळा सुरू होईल. असे तर सगळ्याच ऋतू बाबत झाले आहे .ऋतू सुरू होण्याआधीची तयारी आणि ऋतू संपतानाची तयारी संपुष्टात आली आहे.आजही आठवत पावसाळा सुरू होण्यापूर्वी माझी आजी घरावरील छपऱ्यांवर मेनकापड घालायची .पण आता प्रत्येक ऋतूत पावसाळा आहेच की ! ऋतू संबंधीची अनेक विविध फळे सुद्धा नाहीशी होत असताना आपण पाहत आहोत. कागदाची नाव, माकड टोपी ,बंडी या सुद्धा नाहीसा झाल्या आहेत .बोर, जांब, करवंदे या सुद्धा आता कोणत्याही ऋतूमध्ये मिळेल असे झाले.डॉक्टर म्हणतात seasonable फळे खा ;पण season कोणता सुरू आहे हाच गोंधळ असल्याने कोणती फळे कधी खावी हे ही प्रश्नचिन्ह??? सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक ऋतूतील मजा,मिळणारा आनंद सुद्धा आपण गमावून बसलो.जसे पावसात भिजणे ,डबक्यातील पाणी उडी मारून एकमेकांवर उडवणे, झाडाखाली उभे राहून पानांच्या थेंबात भिजणे ,शेकोटी करणे, त्याच्याभोवती रात्री सकाळी बसून अंग शेकणे तसेच त्याच्यासाठी लाकडं ,कागद आणि काड्या गोळ्या करणे ,उन्हाळ्यात गच्चीवर झोपणे ,अंगती पंगती करणे, खारोड्या करणे आणि येता-जाता खाणे. कट्ट्यावर बसून गप्पा मारणे ,आईसक्रोट, कैरीचं पन्ह या सर्व गोष्टी संपुष्टात आल्या.एवढेच काय तर आजच्या पिढीला खरी निसर्ग संपत्ती ऐकायला पाहायलाही मिळत नाही तर अनुभवणं तर दूरच!
"कोणी वाट पाहत असेल तर येणाऱ्या व्यक्तीला वेळेचं महत्त्व असते असे म्हणतात "आज आपण ऋतूंची वाट पाहत नाही म्हणून ऋतूही वेळेवर येत नाही ."बस ये दुनिया चलती जा रही है ।वाचक, हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि हे सर्व फक्त आपल्याच हातात आहे .सर्वांना याचे महत्त्व कळले पाहिजे. निसर्ग आपला मित्र म्हणून निसर्गाशी गट्टी केली पाहिजे, नक्कीच निसर्ग सुद्धा आपल्याला आनंदीच ठेवेल.
वाचक ऑगस्ट,सप्टेंबर महिन्याला निसर्गाचा महिना म्हटले जाते कारण याच महिन्यात सर्व सणांचा बहर आणि निसर्गाची संगत याची देवाण-घेवाण होते. दूर्वा, आघाडा ,केना, सर्व झाडांची पाने विविध फुले ,केळींचे पाने ,केळींचे खांब, अनेक फळे या सर्वांचा मेळ गणपती, हरतालिका ,महालक्ष्मी ,श्रावण महिना या उत्सवांसोबत आणि सणांसोबत असतो, म्हणून तर हा महिना सर्व वयोगटातील लोकांना आवडतो. फक्त श्रद्धेचाच भाग नसून या महिन्याला वैज्ञानिक दृष्टिकोन सुद्धा आहे .या सर्व बहारदार गोष्टींमुळे आपल्या आजूबाजूचे वातावरण ताजेतवाने आणि सकारात्मक होते. या महिन्यात वापरल्या जाणारा आघाडा केना दम अस्थमावर उत्तम औषध आहे. दुर्वांमुळे शरीरात दाह निर्माण होत नाही. तेरडा ही प्रतीकात्मक वनस्पती आहे. या सर्व वनस्पतीमुळे आपल्यात अनेक बदल घडून येतात.आपल्या वागण्यात नम्रता येते. मन भक्तीमय होते. बंधुभाव वाढतो आणि नात्यांमध्ये आपलेपणाचे भावना निर्माण होते. श्रावण महिना आणि भाद्रपद महिना म्हणजे संपूर्ण मराठी महिन्यातील महत्त्वाचे महिने आणि तसेच इंग्रजी महिन्यांमध्ये म्हणलं तर ऑगस्ट आणि सप्टेंबर हे आपल्याला लक्षात आलेच असेल.
सप्टेंबर म्हणजे आठवण ,सप्टेंबर म्हणजे दिवसाची सुरुवात ताजी ,सप्टेंबर म्हणजे संधीचे जग आणि सप्टेंबर म्हणजे सकारात्मकतेची चावी.एका कवीने छान वर्णन केले आहे.
आओ सितंबर आओ
तुम्हारा स्वागत है मेरे आंगन में
सितंबर का रहता है सबको इंतजार
क्योंकि गर्मी से राहत दिलाता है यह मास
ज्यों ज्यों सितंबर जवां है होता
रात बड़ी ओर दिन छोटा होता जाता
नभ नहीं हैअब दुंदभी बजाता
केवल दूर छितराया बादल है नजर आता
हल्के से गुलाबी मौसम का एहसास दिलाता
कभी-कभी वर्षा की हल्की फुहार है लाता
भयंकर बाढ़ वर्षा से राहत दिलाता
स्वर्णिम सूर्य सुखद रश्मियां बिखराता
इस मास में रात की अनूठी शान है निराली
तारों भरा थाल यूं सजा है आली
इसीलिए तो कहती हूं
सितंबर की शोभा होती है निराली.
सौ.स्मिता मोहरीर(अंबुलगेकर)©️नांदेड-7420918198