श्री.गणेश विसर्जन शांततेत संपन्न .!

पणज (डॉ.रतनलाल तायडे) : अकोला येथील श्री गणेश विसर्जन अगदी शांततेत संपन्न झाले. बुधवार वेस पासून सुरू झालेली मिरवणूक परत आपापल्या ठिकाणी वेळेच्या आत पोहचली.मिरवणुकीत सर्व मंडळाचे अध्यक्ष, सदस्य यांनी हिरीरीने भाग घेतला. जल्लोषात श्री गणपती बाप्पा ला निरोप देण्यात आला. मिरवणुकीत सर्व धर्मीयांनी सहभागी होऊन कोणतीही अनुचित घटना घडणार नाही याची सर्वांनी डोळ्यात तेल घालून दक्षता घेतली.ग्रामीण पोलीस स्टेशन चे पो. नि. जुनघरे यांनी विषेश लक्ष घालून त्यांच्या सर्व सहकाय्रांनी अत्यंत दक्ष राहून समयसूचकता दाखविली. तसेच महसूल विभागाने सुध्दा कायदा व सुव्यवस्थेचा भंग होऊ नये म्हणून ग्रामप्रशासनाशी संपर्क ठेवून मिरवणुक शांततेत पार पाडण्यासाठी मोलाची कामगिरी बजावली. त्याचप्रमाणे गावातील सर्व धर्मीयांचे सहकार्य लाभले. आणी ठरवुन दिलेल्या डेड लाईन चे पालन करुन सर्व तरुणांनी सहभागी होऊन सहकार्य केले. व श्री गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत संपन्न झाली.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.