आकोट (वि.प्र.) :आराध्य दैवत पंचक्रोशीत च नव्हे तर राज्यामध्ये प्रसिद्ध असे जागृत देवस्थान माता श्री.महालक्ष्मी (ज्येष्ठागौरी कनिष्ठा गौरी) मातेच्या यात्रेचे आयोजन पणज गावकरी व श्री.महालक्ष्मी मंदिर संस्थान मार्फत दिनांक ११ सप्टेंबर २०२४ बुधवारी करण्यात आले तो यात्रेचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात व नेहमी पेक्षा भव्यदिव्य अशा प्रकारात संपन्न झाला. यावर्षी राज्यातून व परराज्यातील दर्शन घेणाऱ्या भावीक भक्तांची संख्या जवळ जवळ पंचावन्न ते साठ हजारावर होती. संस्थान तर्फे उत्कृष्ट असे नियोजन करण्यात आले होते. पावसापासून संरक्षणार्थ भव्य असे वाटरप्रुफ मंडप, दर्शन मंडप,भोजन मंडप, आर. ओ. फिल्टर चे पिण्याचे पाणी, स्वयंप्रेरणेने सेवा देणाऱ्या गावोगावी च्या बचत गटाच्या रात्रभर स्वयंपाक करीता सेवा देणाऱ्या उत्साही महिला,फिल्टर चे पाणी मोफत उपलब्ध करून देणारे अंजनगाव सुर्जी चे श्री. महालक्ष्मी दुर्गोत्सव मंडळ. सेवाभाव हेच ध्येय ठरवुन सेवा करणारे झपाटलेले उत्साही तरुण, कितीही मोठे काम क्षणार्धात करणारे गावोगावी चे भावीक भक्त.सर्वांची स्तुती करावी तेवढी कमीच. अबब...एवढा मोठ्ठा अवाढव्य कार्यक्रम पण आमच्या सारख्या वयस्कर माणसाला कोणत्याही प्रकारचे टेंशन न देता सर्वांनी अगदी सोयीस्कर रीत्या कोणताही अनर्थ न घडता मातेच्या आशिर्वादाने सहजासहजी पार पाडणारे भावीक भक्त, गावकरी तसेच कार्यक्रमास शासनाच्या वतीने आवर्जून उपस्थित राहणारे आकोट चे कर्तव्यदक्ष उपविभागीय अधिकारी श्री मनोज लोणारकर साहेब,आकोट चे आमदार श्री. प्रकाश पाटील भारसाकडे ,महाराष्ट्राचे माजी गृहराज्यमंत्री श्री.रणजित पाटील साहेब,आकोला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. संगीताताई अढाऊ,मा.मंडळ अधिकारी श्री.नेमाडे साहेब, त्याचप्रमाणे कायदा व सुव्यवस्थेची बाजू समर्थ पणे सांभाळणारे आकोट ग्रामीण चे ठाणेदार श्री. जुनघरे साहेब व त्यांचे सहकारी यांनी आपली जबाबदारी ऊत्कृष्ट पणे पार पाडली.व सर्वांच्या सहकार्याने एवढी मोठी यात्रा मातेच्या आशिर्वादाने निर्विघ्नपणे संपन्न झाली.