भद्रावती (वि.प्र.) : स्थानिक भद्रावती शिक्षण संस्था, भद्रावतीचे अध्यक्ष, डॉ. विवेक नि. शिंदे यांना सत्र 2024 करिता गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली चा उत्कृष्ट अधिसभा सदस्य पुरस्कार प्राप्त झाला आहे.
डॉ. विवेक नि. शिंदे हे गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीचे आधीच्या सत्रातील अधिसभा सदस्य तथा माजि व्यवस्थापन परिषद सदस्य तसेच सध्या अधिसभा सदस्य आहेत. त्यांना हा पुरस्कार त्यांच्या अधिसभा सदस्य म्हणून उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल तसेच विद्यापीठ स्तरीय विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या समस्या सोडविल्याबद्दल तसेच विद्यापीठाची गुणवत्ता वाढीसाठी केलेल्या सततच्या यशस्वी प्रयत्नांसाठी विद्यापीठातील सर्व अधिसभा सदस्यांमधून निवड झाली असून त्यांना दिनांक 2 ऑक्टोंबर रोजी गोंडवाना विद्यापीठाच्या तेराव्या वर्धापन दिन व अकरावा व बारावा बाराव्या दीक्षांत समारंभात विद्यापीठाच्या परिसरातील सभागृहात श्री. सी.पी. राधाकृष्णन, माननीय कुलपती तथा राज्यपाल महाराष्ट्र राज्य तसेच श्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री महामार्ग व रस्ते वाहतूक, भारत सरकार, डॉ. प्रशांत बोकारे, कुलगुरू, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली तसेच डॉ. श्रीराम कावळे, प्र. कुलगुरू यांच्या प्रमुख उपस्थितीत शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.
स्व. निळकंठराव शिंदे, माजी आमदार तथा संस्थापक सचिव यांनी स्थापन केलेल्या भद्रावती शिक्षण संस्था, भद्रावती या शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष पद स्वीकारल्यापासून अस्तित्वात असलेल्या इन्स्टिट्यूशन व्यतिरिक्त भद्रावती परिसरातील सर्व विद्यार्थ्यांसाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मुलींसाठी नीलिमाताई शिंदे महिला महाविद्यालय,स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी डॉ. विवेक शिंदे प्रशासकीय महाविद्यालय तसेच वरोरा शहरात स्व. निळकंठराव शिंदे प्रशासकीय महाविद्यालय सुरू करून हजारो विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे कार्य करीत आहेत.
डॉ. विवेक नि. शिंदे यांना यापूर्वी शैक्षणिक व सामाजिक कार्यकरिता विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
डॉ. विवेक नि. शिंदे यांना उत्कृष्ट अधीसभा सदस्य पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल विद्यापीठातील सर्व अधिकारी वर्ग तसेच भद्रावती शिक्षण संस्था, भद्रावतीचे सर्व पदाधिकारी, प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व सर्व महाविद्यालयीन विद्यार्थी वर्गाकडून हार्दिक अभिनंदन केले जात आहे.