माणसे जपा.माणसे जगवा .!

मधु तारा शासकीय योजना प्रचार आणि प्रसार .!

पुणे (वि.प्र.) : 9 सप्टेंबर 2024 रोजी मधु तारा दिव्यांग सेवा सोशल फाऊंडेशन प्रमुख श्री नितीनजी शिंदे आणि पुणे जिल्हा प्रमुख श्री अनिलजी दांगडे यांनी सातारा जिल्ह्यातील शेंद्रे या गावी जीवाला जीव देणाऱ्या कॅन्सरवर शासकीय योजने अंतर्गत गरीब रुग्णांना उपचार देणाऱ्या ओंनकोन लाईफ कॅन्सर सेंटरला भेट दिली.
आपलही हॉस्पिटल असावं असं वडिलांचं स्वप्न पूर्ण करणारे गरीब रुग्णांना मोफत कॅन्सरवर उपचार देणारे त्यांचे आशीर्वाद घेणारे माणसातील देव आदरणीय मा.श्री उदयजी देशमुख साहेब यांनी ही मधु ताराच्या कार्याची प्रशंसा करत सातारा.तळेगाव.वाघोली पुणे अशा ठिकाणीही ओंनकोन कॅन्सर सेंटर असून सोबत राहून आपण तळागाळातील गरीब रुग्णांसाठी शीबिरे आयोजित करू असे सांगितले.
या वेळी सेंटरचे एडमिनिस्ट्रेशन प्रमुख श्री विनायकजी भोसले यांनी सेंटरच्या कार्याविषयी अत्यंत विसृत सविस्तर माहिती दिली.सेंटरचे मार्केटिंग विभागाचे पीआरओ श्री अनिरुद्धजी अडागळे यांनी संपूर्ण सेंटरची पाहणी मधु ताराला करवून दाखविली.रेडिएशन सेंटर.ओपीडी. बायप्सी.असे सर्वच विभाग आपुलकीने दाखवले.
या वेळी मधु तारा पुणे जिल्हा प्रमुख श्री अनिलजी दांगडे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. ज्या ज्या वेळेस निःस्वार्थ कार्य घडतं जाते त्या त्या वेळेस माणसातील देव पण दिसून येते असे मधु तारा प्रमुख श्री नितीनजी शिंदे म्हणाले.



Post a Comment

Previous Post Next Post
clipboard. ".