भद्रावती (वि.प्र.) : रोटरी क्लब भद्रावतीच्या वतीने चार्टर्ड दिनाचे व शिक्षक दिनाचे औचित्य साधून कर्तृत्ववान शिक्षकांचा सत्कार लोकमान्य विद्यालयाच्या सभागृहात नुकताच करण्यात आला. "शिक्षक हे समाजाचा आधारस्तंभ आहे. शिक्षकांच्या कार्याचा हा सत्कार आहे" असे अनील धानोरकरांनी सांगितले.
रोटरी क्लब भद्रावती नेहमीच सामाजिक कार्याचे दखल घेत असते. भद्रावती तालुक्यातील प्रत्येक केंद्रातील एक गुणवंत, कर्तृत्व संपन्न शिक्षक व्यक्तिमत्त्वाची दखल घेत शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य सचिन सरपटवार, प्रमुख अतिथी अनिल धानोरकर, डॉ माला प्रेमचंद,भाविक तेलंग, अमित गुंडावर,किशोर खंडाळकर,आत्माराम देशमुख, हनुमान घोटेकर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
भद्रावती तालुक्यातील प्रत्येक केंद्रातील एक याप्रमाणे आदर्श शिक्षक सत्कार करण्यासाठी शिक्षकांची निवड करण्यात आली. ही निवड करताना त्यांचे सामाजिक क्षेत्रातील कर्तृत्व व शिक्षण क्षेत्रातील कर्तृत्व अधोरेखित करून त्यांची निवड करण्यात आली. यात रमेश ठेंगणे बेलोरा, केशव गोंडे कोकेवाडा, अनिल थेरे आगरा, योगेश बोडे चिचोर्डी, विकास मोहिते भद्रावती, ज्योती नगराळे घोडपेठ, अजय मुसळे चिरादेवी, प्रशांत तुरानकर मनगाव, ज्योती तावडे माजरी, संजय माथनकर मांगली, उत्तम निकुरे आष्टा, निसार शेख मुधोली या शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच रोटरी क्लबचे सदस्य असलेले शिक्षक प्रा. डॉ ज्ञानेश हटवार , भिष्माचार्य बोरकुटे, अजय बोंडे, बी. एन. शेंडे, आत्माराम देशमुख, प्राचार्य सचिन सरपटवार, प्रा. रश्मी बिसेन, प्रेमा पोटदुखे, प्राचार्य वर्षा धानोरकर, ज्योती भोसकर, वैशाली देशमुख यांचा देखील मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी मान्यवर अतिथींचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक किशोर खंडाळकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ ज्ञानेश हटवार यांनी केले तर आभार प्रदर्शन रश्मी बिसेन यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अब्बास अजानी, दिलीप राम, विक्रांत बिसेन, सुधीर पारधी, प्रकाश पिंपळकर, किशोर भोसकर, विनोद कांमडी, सचिन कुटेमाटे, विवेक अकोजवार, रुक्साना शेख, सुनीता खंडाळकर आदींनी परिश्रम घेतले.