रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद .!
भिसी (वि.प्र.) : "श्री तरुण उत्साही दुर्गा मंडळ" जुनी ग्रामपंचायत चौक भिसी यांचे तर्फे एक सामाजिक उपक्रम म्हणून मागील पाच वर्षांपासून नवरात्र उत्सवात सतत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे.हि परंपरा कायम ठेवून याही वर्षी सुध्दा भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन दि ६ आक्टोबर २०२४ ला करण्यात आले. यावर्षी या रक्तदान शिबिरात डॉ हेडगेवार रक्तपेढी नागपूर यांनी ४१ रक्तदात्यांचे रक्त संकलन केले आणि रक्तदात्याना टुरिस्ट बॅग व पाणी बाॅटल भेट देत रक्तदात्याचे अभिनंदन केले.
नवरात्र च्या शुभमुहूर्तावर "रक्तदान हेच श्रेष्ठ दान" या संकल्पनेचा प्रचार प्रसार करण्यासाठी अशा नाविन्यपूर्ण उपक्रमाची आवश्यकता आहे. ह्या शिबिरात रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. गावातील तरुण मंडळींनी रक्तदान केले. त्यात धनंजय सहारे, पंकज गाडीवार , दुर्वास नंदनवार, मोहन गाडीवार , समिर घरडे, मोरेश्वर गोषीकवार, सुरज रंदये, रविंद्र लोहकरे, निखिल सहारे, सौ. विभा येरुणकर, गुरुदेव आष्टणकर, अनिकेत कामठी, अनिकेत मुंगले, चैतन्य कामडी, निखिल काळे, सागर श्रीरामे, राहुल बोरकर, मंगेश एकवनकर, तुषार रंदये, मनोज अहेर, सारंगधर देशपांडे, रक्षक चौधरी, मिलिंद मुंगले, प्रज्वल चिंचुलकर, अक्षय ढोणे, प्रशांत खवसे, प्रणय मस्के,अभिजित तेजने, श्रेयस वानखेडे,सौ.सुषमा डुकरे, जगदीश खामनकर, स्वप्निल गंधरे, जगदीश डुकरे, ऋषिकेश येरुणकर, मिलिंद निमजे, विलास खाटीक, केवल येरुणकर, वैभव निमजे, भुपेंद्र डानोडे, सचिन रंदये, संदीप कामडी यांचा समावेश आहे.
या भव्य रक्तदान शिबिराच्या यशस्वितेसाठी *डॉ हेडगेवार रक्तपेढी नागपूर व श्री तरुण उत्साही दुर्गा मंडळ जुनी ग्रामपंचायत चौक* भिसीच्या सर्व पदाधिकारी, सदस्य, सहकारी सदस्य तसेच हितचिंतक यांनी परिश्रम घेतले. आरोग्य विषयक उपक्रम राबविण्यात आल्याने मंडळाचे सर्वत्र कौतुक होत आहे.