कोजागिरी व गुणवंत विद्यार्थी सत्कार कार्यक्रम सम्पन्न ..!

श्री संत तुकाराम महाराज सेवा मंडळ बल्लारपूर-बामणी यांच्या वतीने कोजागिरी व गुणवंत विद्यार्थी सत्कार ..!

बल्लारपुर (का.प्र.) : दरवर्षी प्रमाणे धनोजे कुणबी समाजाच्या मंडळाच्या वतीने कोजागिरी व गुणवंत विद्यार्थी सत्कार कार्यक्रम मंडळाचा अध्यक्षते खाली श्री पांडुरंग जरीले यांच्या हस्ते घेण्यात आला. येथे प्रमुख पाहूणे म्हणून लाभलेले श्री. सुधाकर अडबाले सर (शिक्षक आमदार विधान परिषद नागपूर विभाग), डॉ अॅड अंजलीताई साळवे (समुप्रदेशक / सल्लागार राष्ट्रिय महीला आयोग दिल्ली) मा. अॅड दिपक चटप (चेवेनिंग स्कॉलर व सामाजिक कार्यकर्ते) व मा. प्रल्हादजी ठक (कला शिक्षक आनंदवन वरोरा) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सुरुवातीस जिजाऊ माता, जगतगुरु संत तुकाराम महाराज व शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्य अर्पन करुन दिप प्रज्वलित करण्यात आले. कार्यक्रमाला धनोजे कुणबी समाजाचे युवा आघाडी व महिला आघाडी यांच्या वतीने चित्रकला (निसर्गचित्र). भाषण (मोबाईल चे फायदे व टोटे/महिलांवर होणाऱ्या अत्याचाराला आळावा घालण्यासाठी उपाय योजना) एकल नृत्य/सामोहीक नृत्य, महीलांसाठी एक मिनिटांच्या गेम असे विविध कार्यक्रम घेण्यात आले. सत्कारमुर्ती म्हणून लाभलेले प्रा. श्री युगराज बोबडे संचालक (श्री संत तुकाराम महाराज सेवा मंडळ बल्लारपूर-बामणी), श्री भास्कर वडस्कर संचालक (वडस्कर बिल्डर्स अँड डेवेलपर्स) व श्री केशवराव थिपे संचालक (फायरपॉईन्ट इमरजेन्सी सर्विसेस बल्लारपूर), संचालन करणारे श्री नितिन वरारकर, कु आचल काकडे तर आभार प्रदर्शन बालाजी भोंगळे यांनी केले. श्री मा. सुधाकरजी अडबाले सर, डॉ अॅड अंजलीताई साळवे, मा. अॅड दिपक चटप व प्रल्हादजी ठक यांनी मौलाचे मार्गदर्शन केले. यशस्वितेसाठी मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग जरीले, उपाध्यक्ष प्रा. मार्कंडेय बोंडे, सचिव प्रा. राजेन्द्र खाडे, सहसचिव श्रीमती कमलताई वडस्कर, कोषाध्यक्ष श्री विनायक साळवे, संचालक मनोहर माडेकर, गजानन घुमूल, शामसुंदर धाडे, युगराज बोबडे, किसनराव पोडे व भास्कर वडस्कर महीला आघाडिचे अध्यक्ष वंदनाताई पोटे, उपाध्यक्ष किरण बोबडे/सुवर्णा कष्टि, सचिव सोनाली काकडे युवा आघाडिचे अध्यक्ष विवेक खुटेमाटे, सचिव अतुल बांदूरकर तसेच सर्वांच्या सहयोगाने पार पडले. एक हजार समाजबांधवानी स्नेहभोजनाचा आनंद घेतला.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.