नगाजी महाराज पुण्यतिथी निमित्त महिला संमेलन संपन्न .!
बल्लारपुर (का.प्र.) : भद्रावती येथील नगाजी महाराज मंदिर मंजुषा ले आऊट परिसरात संत नगाजी महाराज पुण्यतिथी महोत्सव संपन्न झाले. या दोन दिवसीय संमेलनात विविध उपक्रम राबविण्यात आले. महिला संमेलनात प्रमुख मार्गदर्शक सौ. केशनी ज्ञानेश हटवार भद्रावती यांनी मार्गदर्शन करताना "महिलांनी स्वत्वाला जपून स्वसंरक्षण करावे" असे मार्गदर्शन केले.
नगाजी महाराज पुण्यतिथी महोत्सव आयोजित दोन दिवशी पुण्यतिथी महोत्सवात पहिल्या दिवशी दि. १८/१०/२०२४ ला महिलांसाठी रांगोळी स्पर्धा, पाककला स्पर्धा तसेच महिला संमेलन आयोजित करण्यात आले होते. या महिला सम्मेलन कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ निताताई आंबिलकर , मार्गदर्शक सौ केशनी ज्ञानेश हटवार, प्रमुख अतिथी सौ संगीताताई घोरपडे, सौ. सुरेखाताई अतकरे ह्या व्यासपीठावर उपस्थित होत्या. महिला संमेलनाला मार्गदर्शन करताना "आज साक्षरतेचे प्रमाण वाढूनही महिला अत्याचाराचे प्रमाण फार मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे महिलांनी स्वत्वाला जपून आत्मसंरक्षण करावे, त्यासाठी जागृत राहून खंबीर पावले उचलावी व आत्मविश्वासाने परिस्थितीला सामोरे जावे" असे मार्गदर्शन सौ. केशनी ज्ञानेश हटवार यांनी केले.
यावेळी मंचावर उपस्थित पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त केले व स्त्रीशक्तीला जागृत केले. प्रमुख अतिथींच्या हस्ते रांगोळी स्पर्धा व पाककला स्पर्धेचे प्ररिक्षण करून विजेत्या महिलांना पारितोषिक देऊन सन्मानीत करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. वर्षाताई वाटेकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन सौ. मोनाताई जांभूळकर यांनी केले. यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. महिला संमेलन यशस्वी करण्यासाठी सौ. रागिनी सुत्रपवार, सौ. प्रतिभा दक्षिणे सौ.भुवनेश्वर निंबाळकर, सौ. सविता लांडगे आदी महिलांनी परिश्रम घेतले.