यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालय चिचोर्डी भद्रावती घ्या शिरपेचात मानाचा तुरा .!

भद्रावतीच्या यशराज आकडे, सतिश वळकुंजे, हर्षद माने यांची राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड .!

भद्रावती (वि.प्र.) : सांगली येथे झालेल्या शालेय राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत यशवंतराव शिंदे विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय चिचोर्डी भद्रावती चे तीन विद्यार्थी यांची १७ वर्ष वयोगटाखालील गटामध्ये राष्ट्रीय स्पर्धेकरिता महाराष्ट्र राज्य संघात निवड झाली असून ते राष्ट्रीय स्पर्धा मध्ये महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. 
महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सांगली तर्फे आयोजित राज्यस्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा सांगली जिल्हा येथे पार पडली. या स्पर्धेत यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चिचोर्डी भद्रावती या संघाने नागपूर विभागाचे नेतृत्व केले, व राज्यस्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त करून अजिंक्यपद प्राप्त केले. या स्पर्धेत केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात यशराज आकडे, सतिश वळकुंजे, हर्षद माने या तीन खेळाडूंनी आपले स्थान मिळवून यशवंतराव शिंदे विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय चिचोर्डी भद्रावतीच्या शिरपेचात मनाचा तुरा रोडला. भद्रावतीच्या कबड्डी संघाने महाराष्ट्रात कबड्डी स्पर्धेत अव्वल स्थान प्राप्त करत एक वेगळा आदर्श प्रस्थापित केला .
या तीन खेळाडूंचे कबड्डी संघात राष्ट्रीय स्पर्धेकरिता महाराष्ट्राच्या टीम मध्ये निवड झाल्याने महाविद्यालयातर्फे भद्रावती शहरात वाजत गाजत विजयी रॅली काढण्यात आली. ही रॅली कॉलेजमधून मुख्य मार्गाने भद्रावती शहरात नाग मंदिर व तिथून परत महाविद्यालयामध्ये पोहोचली. महाविद्यालयामध्ये पोहोचल्यानंतर रॅलीचे समारोप प्रसंगी प्राचार्य डॉ जयंत वानखेडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना "ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी स्पर्धेत महाराष्ट्रात अव्वलस्थानी येवून एक आदर्श प्रस्थापित केला, व भद्रावती चे नाव महाराष्ट्रात गाजले. भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती हे नेहमीच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक तसेच क्रीडा क्षेत्रातील उन्नती करिता सातत्याने विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करत आहे. त्याचाच भाग म्हणून आज आपले विद्यार्थी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभागी होत आहेत, आपल्यासाठी हा आनंदाचा व अभिमानाचा क्षण आहे . आपणही यातून यांचा आदर्श घ्यावा" असे सांगितले. 
भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती चे विश्वस्त श्रिमती निलिमाताई शिंदे, अध्यक्ष, डॉ विवेक शिंदे, सचिव, डॉ. कार्तिक शिंदे, सहसचिव, डॉ. विशाल शिंदे, प्राचार्य डॉ जयंत वानखेडे, डॉ सुधीर मोते, क्रीडाशिक्षक, रमेश चव्हाण, डॉ. ज्ञानेश हटवार, किशोर ढोक, डॉ. प्रशांत पाठक, माधव केंद्रे, समस्त प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. भद्रावती व परिसरात त्यांचेवर अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.