श्री देवी विसर्जन संपन्न .!

पणज (डॉ.रतनलाल तायडे) : पणज ता. आकोट येथील श्री देवी विसर्जन शांततेत संपन्न झाले. विसर्जन मिरवणुकीत पाच सार्वजनिक मंडळांनी सहभाग घेतला.पुर्ण गावामधून बॅंडबाज्या डी. जे. लावून शांततेत मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीमधे सर्व सार्वजनिक मंडळाच्या अध्यक्षांनी आपल्या कार्यकर्त्यांसह हिरीरीने सहभाग नोंदविला. त्याच प्रमाणे गावातील तरुण तरुणींनी उत्साहाने नाचतगाजत मिरवणूक काढली. गावातील सर्वधर्मीय नागरीकांनी स्वतः हुन शांततेत मिरवणूक पार पाडली. कायदा व सुव्यवस्थेची बाजु ग्रामपंचायत प्रशासन व आकोट ग्रामीण चे ठाणेदार जुनघरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोखपणे सांभाळली.कोणत्याही प्रकारचा गोंधळ न करता सर्व नागरीकांनी मिरवणूक निर्विवादपणे संपन्न करण्यात सहभाग घेतला.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.