महाविकास आघाडीला धक्का 150 कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश .!

ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश .!

बल्लारपुर (का.प्र.) : बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातील पोंभुर्णा तालुक्यात वेळवा आणि चकठाणा या दोन गावांमधील 150 कार्यकर्त्यांनी काँग्रेस व शिवसेना (ठाकरे गट) पक्षाला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला. या घटनेमुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे.
गेल्या पंधरा दिवसांत बल्लारपूर विधानसभा मतदारसंघामध्ये शेकडो कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेसला लागलेली गळती अजूनही कायम आहे. यात आता ठाकरे गटाचे कार्यकर्ते पक्ष प्रवेश करीत आहे. 150 जणांनी भाजपमध्ये प्रवेश करताच महाविकास आघाडीसाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत.
वेळवा आणि चकठाणा या दोन गावांमधील एकूण 150 जणांनी ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला आहे. मौजा वेळवा आणि चकठाणा येथील युवकांनी आज काँग्रेस व शिवसेनेतून (ठाकरे गट) भारतीय जनता पक्षामध्ये ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते पक्षप्रवेश घेतला. शिवसेना ठाकरे गटाचे नयन मोरे या युवा नेत्याच्या माध्यमातून वेळवा येथिल कार्यकर्त्यांनी भाजपा मध्ये पक्ष प्रवेश घेतला. यावेळी पोंभुर्णा तालुक्यातील प्रमूख सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

ना. सुधीर मुनगंटीवार यांना सर्वधर्म समभाव प्रभूसेवा संस्थेचा पाठिंबा जाहीर .!

बल्लारपूर - राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे भाजप-महायुतीचे अधिकृत उमेदवार ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांना चंद्रपूर येथील सर्वधर्म समभाव प्रभूसेवा संस्थेने पाठिंबा जाहीर केला आहे. ना. श्री. मुनगंटीवार हे एक सामाजिक जाणीव जपणाने नेतृत्व असल्याचे सांगत निराधारांना आधार देणाऱ्या या संस्थेने पाठिंब्याचे पत्र जारी केले आहे.
‘आमची संस्था दिव्यांग, निर्वासित, मनोरुग्णांना निःशुल्क कटिंग-दाढी, आंघोळ, पादत्राणे, नवीन वस्त्र परिधान करुन देणे व स्वच्छ करुन देणे अशा प्रकारची सेवा देते. आमच्या संस्थेचे कार्य चंद्रपूर व बल्लारपूर भागात मोठ्या प्रमाणात आहे. या संस्थेचे पाचशेच्यावर सदस्य आहेत. आमच्या संस्थेने आपणास समर्थन देण्याचे ठरविले आहे. आम्ही आपल्याला पूर्णशक्तीने सहकार्य करू,’ असे पत्र संस्थेचे अध्यक्ष रमेश हनुमंते आणि उपाध्यक्ष अरुणभाऊ मांडवकर यांनी ना. श्री. मुनगंटीवार यांना दिले आहे.
ना. श्री. मुनगंटीवार यांना समाजाच्या विविध घटकांकडून सातत्याने समर्थन वाढत आहे. विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थांनी पुढे येऊन ना. श्री. मुनगंटीवार यांना बिनशर्त पाठिंबा दिला आहे, हे विशेष.

आदिवासी आणि दुर्लक्षित घटकांच्या विकासासाठी कटीबद्ध - ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांची ग्वाही .!
शेवटच्या घटकाचे कल्याण करण्याच्या भावनेने कार्य .!

पोंभुर्णा (वि.प्र.) : जल, जंगल, जमिनीचे रक्षण करत पर्यावरण जपणाऱ्या आदिवासी बांधवांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच आदिवासी आणि दुर्लक्षित घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध असल्याची ग्वाही ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
पोंभुर्णा तालुक्यातील चेकआष्टा येथे आदिवासी बांधवांशी संवाद साधताना ते बोलत होते. ते म्हणाले, ‘आदिवासी आणि अनुसूचित जातीतील बंधू-भगिनी अजूनही मुख्य प्रवाहापासून वंचित आहे. त्यांना जीवनातील अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, रोजगार आणि आरोग्य या सहा मूलभूत गरजापासूनही उपेक्षित आहे , त्या सर्वांच्या कल्याणासाठी, विकासासाठी आणि प्रगतीसाठी सर्व शक्तीनिशी उभा राहील.’ 
चेकआष्टा गावातील विविध विकासकामांसाठी तसेच पाणंद रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला. येथील आदिवासी बांधवांच्या मागणीनुसार, माता मंदिराचे नूतनीकरण, पाणंद रस्त्याचे डांबरीकरण तसेच सामाजिक सभागृहासमोरील परिसरात पेव्हिंग ब्लॉक लावून देण्यात येतील. या गावाच्या विकास कामांसाठी लागणारा आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल. समाजातील शेवटच्या घटकाचे कल्याण व्हावे ही भावना मनात ठेवून कार्य करण्यात येत आहे. जेवढी कामे या मतदारसंघात तसेच जिल्ह्यात केली महाराष्ट्रात कोणत्याही विधानसभेत इतकी विकासकामे झालेली नाही, याचा अभिमान असल्याचे ना. मुनगंटीवार म्हणाले.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard. ".