मी व माझी पत्नी दुपारी बसून चर्चा करत होतो, तेव्हा माझ्या पत्नीने मला प्रश्न विचारला, " मला सांगा, माणसाची मुलगी की मुलगा त्याच्या म्हातारपणाचा आधार असतो?"
मी म्हणालो- हा प्रश्न न विचारलेलाच बरा. पण ती आग्रह करू लागली म्हणून सविस्तर सांगावे लागले.
मी म्हणालो म्हातारपणाचा आधार मुलगा किंवा मुलगी नसून "सून" असते.
मुलगा किंवा मुलगी ही म्हातारपणाची काठी असते असे आपण अनेकदा लोकांकडून ऐकले आहे, म्हणूनच लोकांना आपल्या आयुष्यात "मुलगा आणि मुलगी" हवी असे वाटत असते. जेणेकरून म्हातारपण चांगले पार पडावे.ही गोष्ट सुद्धा खरी आहे कारण घरात फक्त मुलगाच सून आणतो. सून आल्यानंतर मुलगा आपल्या पत्नीच्या खांद्यावर जवळजवळ सर्व जबाबदारी टाकतो आणि मग सून ही सासू व सासऱ्याच्या म्हातारपणाची काठी बनते.
होय! माझा विश्वास आहे की ती सूनच आहे जिच्या पाठिंब्याने वृद्ध सासू आणि सासरे आपले आयुष्य चांगले घालवतात.
सुनेला तिच्या सासू आणि सासऱ्यांची संपूर्ण दिनचर्या माहीत असते. कधी आणि कोणता चहा द्यायचा, नाश्त्याला काय द्यायचे, जेवण काय बनवायचे,कोणत्याही परिस्थितीत जेवण रात्री नऊच्या आधी बनवायचे. सायंकाळी झोपताना दूध द्यायचे. पायाला तेल लावायला द्यायचे.सासू-सासरे आजारी पडले तर सून मनापासून त्यांची काळजी घेत असते.
सून एक दिवस आजारी पडली किंवा माहेरी निघून गेली तर सगळं घर हादरून जातं. पण मुलगा पंधरा दिवसांच्या प्रवासाला गेला तरी सुनेच्या भरवशावर घर सुरळीत चालते.सून नसताना सासू-सासरे यांना कोणीतरी आपली काठी हिसकावून घेतल्यासारखे वाटते. त्यांना दुसरे कोणी विचारत नसतात. जावई व मुलगी फक्त पाहुणचार करू शकतात. कारण पाहुण्याच्यात येणारे अनुभव वेगळे असतात. सगळे स्वार्थाचे धनी असतात.
सूनच खरी जबाबदारी पार पाडत असते.कारण मुलाकडे वेळ नसतो आणि मुलाला वेळ मिळाला तरी तो काहीच करू शकत नाही. कारण त्याला सकाळपासून रात्रीपर्यंत आई बाबांना काय द्यावे हेच कळत नाही? मुलगा फक्त आर्थिक जबाबदारी पार पाडू शकतो.
मुलगा फक्त विचारतो.जसे "आई बाबांनी जेवण केले आहे का?" "चहा प्यायला का?" "नाश्ता केला का?" पण ते काय खातात? कोणता चहा पितात हे शोधण्याचा प्रयत्न कधीच करत नाही? ही जवळपास सगळ्या घरांची परिस्थिती आहे.
सासूची मनापासून सेवा करणाऱ्या अशा सूनबाई मी अनेक पाहिल्या आहेत. अशा महिलांना मनापासून धन्यवाद देतो. सून हीच म्हातारपणाची खरी काठी आहे असे मी मानतो. पण अजून एक गोष्ट खरी आहे की तुम्हालासुद्धा समज असायला हवी की सदैव "माझा राजा बेटा!" "माझी राणी मुलगी!" चा जप सोडा. "माझी चांगली सून!" सुद्धा अंतर्भूत केले पाहिजे.
म्हणून, आपल्या सुनेमध्ये फक्त दोष शोधू नका, तिच्या चांगल्या गुणांची प्रशंसा करा. सुनेचा त्याग आणि सेवा ओळखा
मुलगा आणि मुलगीच्या आधी सुनेला स्वतःचे समजा आणि "माझी मुलगी - माझा अभिमान" "माझा मुलगा - माझा अभिमान" म्हणणे थांबवा...
अभिमानाने म्हणा माझी सून, माझा अभिमान.
🖋️.. आनंद शिंदे बाबा ..!