निवडणुकीच्या धामधुमीतही ना. सुधीर मुनगंटीवार शेतकऱ्यांप्रती संवेदनशील .!

ना. मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे ४२ धान खरेदी केंद्रांना मंजुरी .! 

चंद्रपूर (वि.प्र.) : राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे भाजप-महायुतीचे अधिकृत उमेदवार ना. श्री. सुधीर मुनगंटीवार निवडणुकीच्या धामधुमीतही शेतकऱ्यांप्रती संवेदनशीलता जपताना दिसत आहेत. त्यांच्या पाठपुराव्यामुळे आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत २०२४-२५ या हंगामासाठी शासन निर्णयानुसार चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांनी प्रस्तावित केलेल्या ४२ धान/भरडधान्य खरेदी केंद्रांना मंजुरी प्रदान करण्यात आली; तेव्हा याची प्रचिती आली.
ना. श्री. मुनगंटीवार यांनी यासंदर्भात पत्रव्यवहाराद्वारे संबंधित विभागाकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता. त्याला आता यश आले आहे. मुल तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती मुल आणि विविध कार्यकारी सहकारी संस्था राजोली, बल्लारपूर तालुक्यातील कोरपना तालुका खरेदी विक्री समिती कोरपना खरेदी केंद्र कोठारी, पाेभूंर्णा तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पाेभूंर्णा यासोबतच जिल्ह्यातील ४२ धान/भरडधान्य खरेदी केंद्रांना मंजुरी प्रदान करण्यात आली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात खरीप आणि रब्बी हंगामात धान पिक घेतली जाते. या खरेदी केंद्रांच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना धान खरेदी केंद्रावर धानाची नोंदणी होऊन धान विक्री करता येणार आहे. त्यामूळे शासनाकडून नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना धानाचा बोनसचा लाभ घेता येणार आहे. ना. मुनगंटीवार यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ४२ धान खरेदी केंद्रासाठी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. मागील वर्षी २०६४६ शेतकऱ्यांचे ५९८५२९.३४ क्विंटल धान खरेदी करण्यात आली असून त्याची रक्कम १३०.६५ कोटी असून सर्व चुकारे शेतकऱ्याना देण्यात आलेल आहेत. चालू वर्षी सर्व शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करावी असे आवाहन ना. मुनगंटीवार यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.