बल्लारपूर (का.प्र.) : एक नेता एका मतदारसंघाचे चित्र कसे पालटू शकतो याचे मूर्तिमंत उदाहरण बल्लारपूर मतदारसंघ ठरतो आहे. आजवरच्या विकासाला अधिक गतीमान करताना भाजपा महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी या क्षेत्रात तब्बल ५६,०७७.५ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे प्रस्ताव मंजूर करवून घेतले असून येत्या ५ वर्षांत सुमारे २८ हजार रोजगार निर्माण होत आहेत.
बल्लारपूर मतदारसंघातील मतदारांची गेल्या तीन टर्ममध्ये अविरत सेवा करताना मुनगंटीवारांनी विविध माध्यमांतून विकासरथ पुढे नेला आहे. विरोधी पक्षात असतानाही मतदारसंघाचा विकास करवून घेणारे आक्रमक आणि तितकेच विनम्र नेतृत्त्व म्हणून सुधीरभाऊंनी पावती मिळवली आहे.
गतिमान विकासाची चौकट (खालील टेबल टाकणे...)
कंपनी – गुंतवणूक - रोजगार
लॉईड – ६४०० – २०००
आरबीएस २२५ – ३५०
ऑरोबिनो रियाल्टी इन्फ्रा – ६५५ – ११३०
केपीसीएल – ६७५ – ९७५
अल्फाल्गी टेक – १६० – २००
सनफ्लॅग आयर्न अँड स्टील – ३१०.५ – १०८०
राजुरी मेटल – ६०० – १०००
अल्ट्रा टेक-एसीसी – ५० – ५०
ग्रेटा ग्रुप – १२५० – ८००
डेस्टिनो मिनरल्स अँड मेटल – २० – ४०
अंबुजा सिमेंट – २५०० – २००
चंद्रपूर सुपर थर्मल पॉवर स्टेशन – ३२३२ - -
अर्सेलोर मित्तल निप्पॉन स्टील – ४०,००० – २०,०००
एकूण गुंतवणूक – ५६,०७७.५ कोटी
एकूण रोजगार २७,८२५
या मातीच्या सेवेसाठी, मतदार जनता सुधीरभाऊंपाठी!
थोडक्यात काय तर, बल्लारपूरवासियांना आता येत्या ५ वर्षांमध्ये विकासपुरुष हवा की डॉक्टरकी सांभाळत ठेकेदारी करणाऱ्यांच्या हाती मतदारसंघ द्यायचा, हे ठरवायचे आहे. त्यामुळे, राष्ट्रविकासाची कास धरत बल्लारपूरचाही चौफेर विकास करायचा असेल तर सुधीरभाऊंशिवाय पर्याय नसल्याचेच समस्त बल्लारपूरवासियांचे मत आहे.
वनसंपदा जपण्याबरोबरच शेतीक्षेत्रातही बल्लारपूर मारणार बाजी .. शेतकऱ्यांसाठी दरवर्षी कृषी महोत्सव .!
बल्लारपूर : वनसंपदेने नटलेला बल्लारपूर मतदारसंघाला वन पर्यटनाच्या माध्यमातून एक नवी ओळख मिळाली आहेच. पण आता पर्यटन पूरक रोजगार निर्मितीला प्रोत्साहन देतानाच वन्य प्राण्यांमुळे होणारे शेतीचे नुकसान टाळण्यासाठी विविध उपाय योजण्याचे वचन भाजपा महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहे.
वन जमिनीचे पट्टेवाटप, वन जमीन पट्टे, दावे तत्काळ निकाली काढण्याबरोबरच विविध अतिक्रमणधारकांनाही पट्टे देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याचे आश्वासनही सुधीरभाऊंनी दिले आहे. महसूल जमिनीसंबंधी गावांमधील घरांचे प्रश्नही मार्गी लागणार जेव्हा सुधीरभाऊ पुन्हा येणार!
बळीराजा सुखी होणार!
सुधीरभाऊंच्या वचननाम्यात शेतकऱ्यांसाठी नियोजित कार्यक्रम आखण्यात आला आहे. शेतमालासाठी आधुनिक बाजारपेठ, धान क्लस्टरच्या उभारणीतून त्यावरील उद्योगांना चालना मिळणार आहे.
मामा तलावांना जोडणाऱ्या पाण्याच्या स्रोतांचे पुनरुज्जीवन घडवून बारमाही पाणी मिळवून देणार. तसेच, मामा तलावांचे खोलीकरण व नूतनीकरण करून मासेमारीला प्रोत्साहन दिले जाणार आहे.
वार्षिक कृषी महोत्सवातून शेतकरीच केंद्रबिंदू !
सुधीरभाऊंच्या वचननाम्यात शेतकरी केंद्रस्थानी आहे. बल्लारपूर मतदारसंघात दरवर्षी कृषी महोत्सव भरवून इथल्या शेतमालाला मोठी बाजारपेठ मिळवून देण्याचा मानसही आहे.
शेतीमालावरील प्रक्रिया उद्योगांना स्थानिक एमआयडीसीत आणायचे नियोजन असून शेतीकामासाठी मजूर उपलब्ध करून देण्याची महत्त्वपूर्ण योजना तयार करण्यात आल्याचे वचननाम्यात म्हटले आहे.
शेतशिवारातून मुख्य रस्त्यांना जोडणाऱ्या पाणंद रस्त्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. तसेच, भाजीपाला आणि डेअरी क्लस्टरमार्फत शेतकऱ्यांना एक पाऊल पुढे नेण्याचा संकल्प सुधीरभाऊंनी केला आहे.
देशी गोवंश पालनकर्त्यांसाठी विशेष योजना आखण्यात आल्या असून त्यांना अनुदान व चारा उपलब्ध करून देणार असल्याचेही वचन सुधीरभाऊंनी दिले आहे.