बल्लारपूर (का.प्र.) समाजसेवेचा दिखावा करून जनसामान्यांमध्ये आपली प्रतिमा उजळ करणाऱ्या पण दुसरीकडे डॉक्टरीपेशाला कलंकित करून एका निरापराध लहान मुलावर चुकीची ट्रीटमेंट करून जीव घेणाऱ्या बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील कांग्रेसच्या बंडाखोर उमेदवार डॉ. अभिलाषा गावतुरे आता एका प्रकरणात अडचणीत आल्या आहे.
दरम्यान, चुकीच्या ट्रीटमेंटमुळे डॉ. गावतुरे यांच्या रुग्णालयात मुलाचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी आरोग्य विभागाकडे रुग्णालयातील सिसिटीव्ही फुटेज व इतर दास्तावेज पाठवून अहवाल मागवला. त्यानंतर डॉ. अभिलाषा गावतूरे यांना मुलाच्या मृत्यूसाठी जबाबदार धरून हत्तेचा गुन्हा दाखल होणार असल्याची शक्यता वर्तवली गेली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान जनतेत डॉ. अभिलाषा गावतुरे यांच्या विरोधात मोठा संताप व्यक्त होत आहे.
मागील दोन ते तीन महिन्यांपूर्वी विठ्ठल मंदिर वार्डातील श्रीपर्ण रविकिरण मुरकुटे वय 10 वर्ष याला मण्यार नावाचा साप चावला असल्याचे समजताच डॉ. अभिलाषा गावतूरे यांच्या चंद्रपूर तेथील रुग्णालयात भरती केले होते. सकाळी मुलाची प्रकृती बरी होती, पण त्याला रुगालयात भरती केल्यानंतर जो उपचार करण्यात आला, त्यामुळे मुलाची प्रकृती बिघडली.
मुलाच्या पालकांनी साप चावला असल्याची माहिती डॉ. गावतुरे यांना दिली होती. मात्र कुठेही खूण दिसत नसल्याने ‘मुलाला काहीही झाले नाही तो बरा होईल’, असे सांगून डॉ. गावतुरे या त्यांच्या पाळीव कुत्र्याला घेऊन बाहेर फिरायला गेल्या. या दरम्यान मुलाची प्रकृती बिघडत होती. त्यामुळे मुलाच्या वडिलांनी डॉ. गावतुरे यांना बाहेर जाऊन याची माहिती दिली. तुम्ही तातडीने उपचार करा, अशी विनवणी केली. पण तरीही त्या आल्या नाहीत. उलट मुलगा नाटकं करतोय असं सांगून तो लवकर नॉर्मल होईल, असे सांगून वेळ मारून नेली.
काही वेळाने जेव्हा डॉ. गावतुरे आल्या तेव्हा मुलाची अवस्था आणखी बिघडली होती. त्यामुळे त्या घाबरल्या व त्यांनी डॉ. वासाडे यांच्या खाजगी रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका बोलावली. मात्र त्या रुग्णवाहिकेत मुलाच्या आई वडिलांना बसू दिले नाही. स्वतः एका नर्ससोबत एम्ब्युलन्समध्ये बसल्या. त्यानंतर डॉ. वासाडे यांच्या रुग्णालयात अतिदक्षता विभागात भरती केले.