तडाली बनणार जगाचं नंबर १ फर्निचर हब .. सुधीरभाऊंमुळे तडाली पोहोचले जगाच्या नकाशावर .!
बल्लारपूर (का.प्र.) : सागवानी लाकूड म्हणजे फर्निचरमधलं संगमरवरच! चंद्रपुरातलं तडाली हे छोटंसं गाव आता जगाच्या नकाशावर पोहोचलंय ते त्याच्या अमूल्य, मजबूत, टिकाऊ सागवानी लाकडामुळे! बल्लारपूर मतदारसंघाच्या विकासाच्या वाटेवर या छोट्याशा गावानेही विक्रम नोंदवलाय आणि तेजोमय भविष्याकडे वाटचालही सुरू केली आहे, ती सुधीरभाऊंच्या व्हिजनमुळे!
तडाली बनणार फर्निचर निर्यातीचे केंद्र :
तडालीमध्ये तब्बल ४० हजार चौरस मीटर जागेत फर्निचर बनवण्यासाठी जागतिक दर्जाच्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ज्यामुळे इथले फर्निचर जगभरात निर्यात करता येईल. त्यासाठी पहिल्या टप्प्यात ५० कोटी आणि दुसऱ्या टप्प्याट २५ कोटी रुपयांचे नियोजन करण्यात आले आहे. यातून २०० कामगारांना कायमस्वरुपी रोजगार मिळणार आहे. या प्रकल्पासाठी सुधीर मुनगंटीवारांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरू असून दिल्लीस्थित सल्लागाराची नियुक्तीही करण्यात आली आहे.
राम मंदिर बांधणीचे पुण्य :
तडालीचे लाकूड अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामात वापरले गेले आहे. एवढेच नव्हे तर, पंतप्रधान कार्यालयातील खुर्च्या व इतर फर्निचरही तडालीच्याच सागवानी लाकडापासून बनवले गेले आहे. त्यामुळे, पंतप्रधान नरेंद्र मोदींसह त्यांच्या कार्यालयातील सर्वजण तडालीचे फर्निचर वापरत असल्याचे आपण अभिमानाने सांगू शकतो. भारतीय रेल्वेच्या ट्रॅकमधील स्लीपरसुद्धा इथल्याच लाकडाचे आहेत.
तडाली म्हणजे सागवानी लाकडांचं माहेरघर :
सुधीरभाऊ मुनगंटीवारांच्या दूरदृष्टीमुळे तडालीसह संपूर्ण चंद्रपूर जिल्हा विकासाच्या महामार्गावर जात आहे.राज्यातील वनवैभव कमी होऊ नये म्हणून नव्या वृक्षारोपणाचाही धडाका सुधीरभाऊंनी लावलाय. त्यामुळे, येत्या काळात जिल्ह्यात जगाचं फर्निचर हब बनवायचं असेल तर सुधीरभाऊंना पर्याय नाही, असे इथल्या स्थानिकांचे मनोगत आहे.
मुल एमआयडीसीतून उद्योगविश्व विकासवाटेवर ..
सुधीर मुनगंटीवारांच्या नियोजनामुळे वाहताहेत उद्योगवारे .!
बल्लारपूर : काही वर्षांपूर्वी ज्या एमआयडीसीतील रिकामे भूखंड टीका ओढवून घेत होते, तीच मुल एमआयडीसी आज हाऊसफुल्ल झाली आहे. बल्लारपूर मतदारसंघासाठी मुल एमआयडीसी तब्बल ४ हजारांवर रोजगार देत असून येत्या काळात हा आकडा आणखी वाढणार आहे. बल्लारपूरचे आमदार व मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या अथक प्रयत्नांमुळे आज हे शक्य होताना दिसत आहे.
एडव्हान्टेज चंद्रपूरसारखे इव्हेंट मोठमोठ्या कंपन्यांना आकर्षित करण्यास कारणीभूत ठरले आहेत. उद्योग जगतातून येणाऱ्या कोट्यवधींच्या गुंतवणुकीमुळे बल्लारपूरचे भविष्य उद्योगमय विश्वात उज्ज्वल होत आहे. रस्ते, पाणी, वीज या मूलभूत सुविधांसह स्थानिकांना रोजगारांच्या नवनव्या संधी निर्माण झाल्या आहेत. आणि भविष्यातही सातत्याने विकासाच्या वाटेवर धावण्यासाठी भाजपाचे आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार गेली अनेक वर्षे करत असलेल्या प्रयत्नांचे हे यश आहे.
मुल एमआयडीसीतील टॉप १० उद्योग :
कंपनीचे नाव - गुंतवणूक (कोटी रु.) – रोजगार संख्या :
१. मे. जी. आर. किष्णा फेरो अलाईड प्रा. लि. - ७४० - ६५०
२. मे. महिला आर्थिक विकास महामंडळ - ६३५ - २५०
३. मे. ग्रेटा एनर्जी लि. - ६०० - ४०
४. मे. भाग्यलक्ष्मी मेटल प्रा. लि. - ४५२.४ - ७५०
५. मे. पृथ्वी एलाईज प्रा. लि. - ४१० - ७५०
६. मे. चिंतामणी फॅब्रिकेशन प्रा. लि. - ३५० - ९३०
७. मे. कार्निवल इंडस्ट्रिज प्रा. लि. - १७६.५० - ४२५
८. मे. दिनानाथ अलाईड स्टील - १६० - १००
९. मे. राजुरी स्टील प्रा. लि. - ११४.३९ - ७८०
१०. मे. सॉइलॉन स्टील प्रा. लि. - ६५ - १२०
त्यामुळे, सुधीरभाऊंनी ज्या उपेक्षित बल्लारपूरला विकासाच्या नकाशावर आणण्यासाठी अपार मेहनत घेतली आहे, तो विकास असाच पुढे होत राहणे गरजेचे आहे. सुधीरभाऊंशिवाय बल्लारपूरचे चित्र बदलण्याचा विचारही करता येतो का? त्यामुळे, विचार करा आणि मतदान करा!