आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री श्री. पवन कल्याण यांची 17 नोव्हेंबरला जाहीर सभा ..!

ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ बल्लारपूरमध्ये करणार संबोधित .. नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन ..!

बल्लारपूर (का.प्र.) : बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार विकासपुरूष ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ रविवार, दि. 17 नोव्हेंबरला बल्लारपूर येथे जनसेना पार्टीचे अध्यक्ष व आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री तसेच सुप्रसिद्ध दाक्षिणात्य पॉवरस्टार अभिनेते श्री. पवन कल्याण यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.
श्री. पवन कल्याण यांची जाहीर सभा बल्लारपूर येथील डब्ल्यूसीएल कॉलनी मैदानावर सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आली आहे. पवन कल्याण हे जनसेना पार्टीचे संस्थापक अध्यक्ष आहेत. आंध्रप्रदेशात एक दमदार युवा नेतृत्व म्हणून त्यांचा लौकीक आहे. जनकल्याणाचा ध्यास घेतलेले एक नेतृत्व ना. श्री. मुनगंटीवार यांच्यासारख्या तडफदार लोकनेत्याच्या प्रचारार्थ सभा घेणार असल्याने बल्लारपूरवासियांमध्ये कमालीचा उत्साह आहे. 
ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली बल्लारपूर विधानसभेतील विकासाला अधिक गती प्राप्त झाली आहे. बल्लारपूर विधानसभेचा चेहरामोहरा बदलला असून यापुढेही अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्णत्वास आणणार आहे. भाजपा महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार त्यांच्या निवडणूक प्रचारार्थ आयोजित श्री. पवन कल्याण यांच्या सभेला जास्तीत जास्त संख्येने नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.