ना. सुधीर मुनगंटीवार यांना क्षत्रिय पोवार समाजाचा विनाशर्त पाठिंबा .!

बल्लारपूर (का.प्र.) : क्षत्रिय पोवार राजाभोज सेवा बहुउद्देशीय मंडळ, दुर्गापुर तसेच ऊर्जानगर परिसरातील सर्व समाज बांधवांचा बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे भाजप-महायुतीचे अधिकृत उमेदवार ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांना विनाशर्त पाठिंबा जाहीर केला आहे.
दुर्गापूर येथील संवाद कार्यक्रमात क्षत्रिय पोवार समाजाने विधानसभा निवडणुकीत ना. मुनगंटीवार यांना पाठिंबा देण्याचा एकमताने निर्णय घेतला. ना. श्री. सुधीर मुनगंटीवार गेल्या तीस वर्षांपासून जनतेची अविरत सेवा करीत आहे. जनतेच्या सेवेचे व्रत त्यांनी हाती घेतले असून क्षेत्राच्या विकासासाठी विविध योजनांच्या माध्यमातून ते सतत कार्य करीत आले आहे. 
ना मुनगंटीवार यांच्या विकास कार्याने प्रेरित होऊन क्षत्रिय पोवार राजाभाेज सेवा बहुउद्देशीय मंडळ दुर्गापुर, ऊर्जानगर परिसरातील सर्व समाज बांधवांनी एकमताने विनाशर्त पाठिंबा जाहीर केला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.