प्रचाराला सुरुवात करण्यापूर्वी पहिल्या मतदाराचा घेतात आशिर्वाद; शेवटच्या दिवशी शेवटच्या मतदाराचा आशीर्वाद .!
बल्लारपुर (का.प्र.) : सुधीरभाऊ मुनगंटीवार गेल्या 30 वर्षांपासून जनतेची सातत्याने सेवा करीत आहेत. आता सातव्यांदा निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत आणि त्यांचा विजय पक्का आहे. पण सुधीरभाऊंच्या प्रत्येक कार्यात वेगळेपण आणि नाविन्य असतं. त्यातील एक म्हणजे निवडणुकीच्या मुख्य प्रचाराची सुरुवात करताना पहिल्या मतदाराचा आशिर्वाद घेणे होय. संपूर्ण राज्यामध्ये मतदारांशी संबंध प्रस्थापित करण्याचा असा अनोखा आणि आगळावेगळा प्रयोग करणारे सुधीरभाऊ पहिलेच नेते आहेत.
सर्वसामान्य जनतेशी प्रत्यक्ष संबंध असणारे सुधीरभाऊ एकमेव नेते आहेत. मतदारसंघातील कोणत्याही व्यक्तीने फोन केल्यावर त्या माणसाला सुधीरभाऊंचा फोन येणार नाही असे कधीच घडले नाही. युवकांकडून ते वयोवृद्ध व्यक्तीपर्यंत कोणीही फोन केला, पत्र लिहिलं, निवेदन दिलं तर त्या प्रत्येक व्यक्तीला उत्तर आल्याशिवाय राहत नाही.
मागील सहा निवडणुकीत त्यांनी प्रचाराची सुरुवात करण्याआधी पहिल्या मतदाराचा आशीर्वाद घेतला आहे. तर प्रचाराचा शेवट सुद्धा शेवटच्या मतदाराचा आशीर्वाद घेऊन करतात. आता सातव्यांदा अर्ज दाखल केल्यावर पहिल्या बूथच्या पहिल्या अनुक्रमणिकेतील, पहिल्या यादीतील पहिल्या मतदाराचा आशीर्वाद त्यांनी घेतला. भटाळी पायली येथे आशा विकास आलोने या पहिल्या मतदाराचा आशीर्वाद त्यांनी घेऊन सत्कार केला. मतदार यादीतील पहिल्या आणि शेवटच्या क्रमांकावरील मतदारांचा असा सन्मान करणारे ते एकमेव नेते आहेत, हे विशेष.
संपूर्ण जिल्ह्यात इतका दांडगा जनसंपर्क कोणत्याही नेत्याचा नाही. विरोधकांशी लढताना आपलं अस्त्र केवळ जनतेचे प्रेम आहे, असे सुधीरभाऊ नेहमी सांगतात. आज त्यांनी पहिल्या मतदारासोबतच शालिनी धर्मेंद्र आलोने , सुंगदा बाई मेश्राम, शारदा भसारकर, योगेश अलोने या मतदारांचे आशीर्वाद घेऊन सत्कार केला. सातव्यांदा निवडणूक लढवत असलेल्या सुधीर भाऊंना भटाळी पायली येथील लोकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद सुधीरभाऊंना मिळाला.
यावेळी भटाळी गावाच्या पुनर्वसनाचे आश्वासन सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. भविष्यात मोठे उद्योग आणून स्थानिकांना नोकरीत प्राधान्य देणार असून भविष्यात फिरते जनसंपर्क कार्यालय निर्माण करून नागरिकांच्या समस्या आणखी लवकर सोडवण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असा शब्द त्यांनी दिला. तसेच 'आवाज दो' या अभियानाच्या माध्यमातून दहा टेलिफोन नंबरवरून नागरिकांना आपल्या समस्या माझ्यापर्यंत पोहचवता येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
आता मुल तालुक्यात काँग्रेसला खिंडार ..!
मुल : बल्लारपूर तालुक्यात काँग्रेसमध्ये खिंडार पडल्यानंतर आता त्याची धग मुल तालुक्यापर्यंत येऊन पोहोचली आहे. मुल येथील राजगडच्या सरपंचांसह इतर सदस्य व विविध समाज बांधवांनी काँग्रेसला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला. बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे. राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या विकासकामावर होऊन आपण भाजपमध्ये आल्याची भावना संबंधितांनी व्यक्त केली आहे. या सर्वांनी आज (शनिवार) ना. श्री. मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.
बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला लागलेली गळती काही थांबत नाहीये. गेल्या आठवड्यात बल्लारपूर येथील शहर युवक काँग्रेसच्या अध्यक्षाने काँग्रेसच्या जाचाला कंटाळून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर येथील काटोली गावातील सरपंचांसह अख्ख्या ग्रामपंचायतने काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आणि भाजपमध्ये प्रवेश केला. या घटनेला चार दिवसही व्हायचे आहेत तोच आता मुल तालुक्यातही काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
मुल तालुक्यातील राजगड गावाचे सरपंच काँग्रेसचे नेते रविंद्र मनोहर चौधरी यांनी अन्य सदस्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबत भोई समाजाचे ऋषी पेठकर, अमोल ठाकूर, माळी समाजाचे संकेत गायधने, माना समाजाचे प्रभाकर चौधरी यांनी ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. ‘सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या विकसात्मक दृष्टिकोनावर विश्वास ठेवून आम्ही भाजपमध्ये प्रवेश करत आहे,’ अशी प्रतिक्रिया काँग्रेसमधून भाजप मध्ये दाखल झालेले सरपंच आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी दिली आहे.
बल्लारपूरमधील धक्क्यातून सावरण्यापूर्वीच :
गेल्या आठवड्यात बल्लारपूर येथे मागासवर्गीयांचे नेतृत्व करणारे बल्लारपूर युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष अरविंद वर्मा काँग्रेसमधील अंतर्गत राजकारणाला व जाचाला कंटाळून भाजपमध्ये आले. त्यांच्यासह प्रकाश वर्मा, मनोज निषाद, संदिप झिमान अशा १०० पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर चार दिवसांपूर्वी काटोली ग्रामपंचायतचे सरपंच राजेश ढुमणे, उपसरपंच कवडू वागाडे, सदस्य अरुण गडकर, रसिका तोडासे यांनी काँग्रेसला रामराम ठोकला. ग्रामपंचायतमधील जवळपास अख्खेच्या अख्खे पदाधिकारी भाजपमध्ये दाखल झाले आहेत. या धक्क्यातून सावरण्यापूर्वीच काँग्रेसला मुलमध्ये खिंडार पडले आहे.