बल्लारपुरात अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण .!

बल्लारपूर, (ता.प्र.). शहरात एका 5 वर्षीय मुलीवर 16 वर्षीय मुलाने लैंगिक शोषण केले. ही घटना रविवारी (दि.11) उघडकीस आली. या घटनेतील आरोपी बालक हा विधी संघर्षग्रस्त आहे. या घटनेविरोधात नागरिकांत रोष व्यक्त होत आहे.
शहरातील एका ट्रकावर खासगी ड्रायव्हर म्हणून काम करणारे आपल्या पत्नीसह दोन मुलीला घेऊन राहतात. रविवारी (दि.10) त्यांच्या पत्नीचे टीईटी परीक्षा असल्यामुळे ते आपल्या 5 वर्षीय मुलीला शेजारच्यांच्या घरी ठेवून पत्नीला चंद्रपूरवरून आण्याकरिता गेले होते. सायंकाळी घरी आले असता त्यांच्या पत्नीने मुलीला नाश्ता करायला आवाज दिले. मुलीला अस्वस्थ बघून आईने विचारले असता तिने 16 वर्षीय मुलाने केलेल्या कृत्याची माहिती दिली. एका खासगी रुग्णालयात तिला उपचारासाठी नेले असता लैंगिक शोषण झाल्याचे पुढे आले. रविवारी मुलीच्या आई वडिलांनी पोलिस स्टेशन येथे तक्रार दिले असून पोलिसांनी त्या 16 वर्षीय मुलावर गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास बल्लारपूर पोलिस करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard. ".